Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

Crime News : पुणे शहरात चोरट्यांचा उच्छाद…

केसनंद फाटा, पिसोळीत घरफोडी, सव्वा सहा लाखांचा ऐवज चोरीला

मोबाईल, दागिने, ऐवजांची चोरी सुरूच

marathinews24.com

पुणेCrime News : शहरातील विविध भागात पादचाऱ्यांकडील दागिने, मोबाइल हिसकावून नेणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत पादचाऱ्यांकडील मोबाइल तसेच दागिने हिसकावून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध मुंढवा आणि कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुण्यात हुंड्यासाठी पत्नीचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी

महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला २६ जून रोजी रात्री आठच्या सुमारास मुंढव्यातील केशवनगर भागातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजारांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. सहायक पोलीसनिरीक्षक राजू महानोर तपास करत आहेत.

कोढवा भागातील गोकुळनगर चौकात पादचारी तरुणाच्या हातातील १० हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी (२७ जून) रात्री घडली. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण मध्यरात्री एकच्या सुमारास गोकुळनगर चौकातून निघाला होता. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तपास करत आहेत.

पीएमपीएल प्रवासी महिलेची ६० हजारांची बांगडी चोरीला

Crime News : पीएमपीएल प्रवासी ज्येष्ठ महिलेच्या हातातील ६० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला विश्रांतवाडीतील धानोरी भागात राहायला आहे. तक्रारदार महिलेची आई पुणे स्टेशन ते वारजे माळवाडी या मार्गावरील बसमधून प्रवास करत होती. बसमध्ये गर्दी होती. प्रवासात चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या हातातील ६० हजारांची बांगडी चोरली. सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करत आहेत.

फ्लॅटचे कुलूप तोडून ऐवज चोरीला

Crime News : फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी २ लाख २० हजारांचा ऐवज लांबविण्यात आल्याची घटना लोहगाव परिसरात घडली. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार लोहगावमधील संतनगर भागात राहायला आहेत. चोरट्यांनी २१ जून रोजी मध्यरात्री सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून २५ हजारांचे दागिने आणि सोन्याचे दागिने असा दोन लाख २० हजार रुपयांचा ऐवज लांबवून चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक राठाेड तपास करत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरटे सोसायटीतील बंद सदनिकांची पाहणी करुन कुलूप तोडून ऐवज लांबवितात.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×