Breking News
शाहू छत्रपतींचा विचारवारसा कृतीतून पुढे न्यावा – डॉ. श्रीपाल सबनीसपुलंसारखा निखळ, निरामय विनोद निर्माण करणारा कलाकार विरळच – शमा भाटेप्रितम मुंडेंनी घेतली घुले कुटुंबियांची भेट; कुटुंबियांना अश्रू अनावरपुण्यातील कॅफेत दोघांनी रचला कट, व्हिडिओ व्हायरलदुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा अटकेत – ४ गुन्हे उघडकीसआरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सखोल तपास – पोलीस अधीक्षकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळामहाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटामहाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय – विशेष लेख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजी

मोक्का कारवाईनंतर तीन वर्ष पोलिसांना गुंगारा

वारजे पोलिसांकडून सराइत गजाआड

marathinews24.com

पुणेCrime News : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केल्यानंतर मागील ३ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणार्‍या सराइताला वारजे पोलिसांनी अटक केली. आकाश सिब्बन गौड (वय २३, रा. .शिवणे, मूळ रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश) असे अटक केलेल्या सराइताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

वानवडीत टोळक्याची कोयते उगारून दहशत – सविस्तर बातमी

गौड आणि साथीदारांनी ५ ऑटोबर २०२२ रोजी क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून शुभम मानकर याच्यावर कोयत्याने वार केले होते. त्याला दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गौड याच्यासह साथीदारांविरूद्ध वारजे पोलिसांनी मोक्का कारवाई केली होती. दरोड्याच्या गुन्ह्यात मार्केटयार्ड पोलीस ठाण्यातही गौडसह साथीदारांविरुद्ध ‘मोक्का’ कारवाई केल्यानंतर गौड पसार झाला होता. पसार झालेल्या गौडचा शोध घेण्यासाटी वारजे पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे गेले होते. त्याच्या नातेवाईकांसह मित्रांकडे चौकशी केली. तेव्हा गौड तेलंगणा वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली होती. तो वास्ताव्याचे ठिकाण सातत्याने बदलत होता.

गौड हा वारजे-एनडीए रस्त्यावर असलेल्या शिवणे भागात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना २६ जून रोजी खबर्‍याने दिली. त्यानंतर शिवणे भागातील मैदानावर साफळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. अतिरिक्त पोलीसआयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वारजे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश बडाख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय नरळे,पोलीस कर्मचारी सागर कुंभार, गणेश शिंदे, योगेश वाघ, अमित शेलार, बालाजी काटे, निखील तांगडे, शरद पोळ, अमित जाधव, अमोल झणझणे, गोविंद कपाटे यांनी ही कामगिरी केली.

गुन्हे शाखेकडून फरार गुंड अटकेत

Crime News : मोक्का कारवाईनंतर फरार झालेल्या कात्रज भागातील सराइताला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली. रुपेश राजन केंद्रे (वय १९, रा. सच्चाईमाता मंदिराजवळ, कात्रज) असे अट केलेल्याचे नाव आहे. आंबेगाव पोलिसांनी केंद्रे आणि साथीदारांविरुद्ध मकोका कारवाई केली होती. कारवाईनंतर तो फरार झाला होता. तो कात्रज भागात आल्याची माहिती उज्ज्वल मोकाशी आणि शंकर कुंभार यांना मिळाली.

पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, मोकाशी, कुंभार, शंकर नेवसे, संजय जाधव, निखील जाधव यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×