Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

क्लस्टर पद्धतीने फळपिकांचे लागवडक्षेत्र वाढावे यासाठी मास्टर ट्रेनर्सचे सक्षमीकरण महत्त्वाचे-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

क्लस्टर पद्धतीने फळपिकांचे लागवडक्षेत्र वाढावे यासाठी मास्टर ट्रेनर्सचे सक्षमीकरण महत्त्वाचे-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्यासाठी त्या त्या क्षेत्रात मोठ्या स्वरुपाचे प्रशिक्षण आयोजित करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

marathinews24.com

पुणे – क्लस्टर पद्धतीने फळपिकांचे लागवडक्षेत्र वाढावे यासाठी मास्टर ट्रेनर्सचे सक्षमीकरण महत्त्वाचे-जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी – जिल्ह्यात समूह पद्धतीने (क्लस्टर) लागवड करण्याचे निश्चित करण्यात आलेल्या पिकांच्या लागवड क्षेत्रात वाढ होण्यासाठी त्या त्या क्षेत्रात मोठ्या स्वरुपाचे प्रशिक्षण आयोजित करावे. संबंधित पिकांसाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या मास्टर ट्रेनर्सचे सक्षमीकरण भविष्यात या पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.

देशासह राज्यामध्ये ई – नोटरी करा; भाजपा व्यापारी आघाडीची मागणी – सविस्तर बातमी 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित दिशा कृषी उन्नतीची – 2029 अभियान आणि ‘ॲग्री हॅकॅथॉन’ बाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, आत्माचे प्रकल्प संचालक सूरज मडके, सर्व तालुक्यांचे तालुका कृषी अधिकारी, विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, दिशा कृषी उन्नतीची-2029 या पंचवार्षिक अभियानात निश्चित केल्यानुसार फळपिके तसेच इतर पिकांच्या लागवडीचे लक्ष्यांक गाठणे गरजेचे आहे. त्यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी करावी. प्रशिक्षणाद्वारे जनजागृती, अधिकाधिक शेतकऱ्यांना सहभागी करून घेणे, त्या त्या भागात प्रक्रिया उद्योग उभारणे, जेणेकरुन शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना बाजारपेठ, योग्य बाजारभाव मिळेल याची खात्री देणे आदी प्रयत्न करावेत.

इंदापूर, बारामती येथे केळी, सूर्यफूल, पुरंदर येथे अंजीर, सिताफळ, जुन्नर येथे आंबा, केळी, स्ट्रॉबेरी पिकांचे प्रशिक्षण आयोजित करावे. प्रशिक्षणासाठी गरजेप्रमाणे पाणी फाउंडेशन, कृषी विज्ञान केंद्रांचा सहभाग घ्यावा. मास्टर ट्रेनर्स हे इतर शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणार असल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकांच्या लागवडीसाठी पुढे येतील.

प्रक्रिया प्रकल्प तसेच अन्य बाबींसाठी निधी विविध योजनांच्या अभिसरणातून (कन्व्हर्जन्स) मिळण्यासाठी कृषी विभाग आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांनी प्रयत्न करावेत. तसेच अतिरिक्त निधीची गरज कंपन्यांचे सामाजिक दायित्व (सीएसआर), बँकेमार्फत वित्तपुरवठा तसेच आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन समितीतून निधी देऊन पुरविण्यात येईल. प्रकल्पांसाठी दाखल केलेले प्रकल्पांचे कर्ज गतीने मंजूर व्हावे यासाठी बँकांसोबत बैठक लावण्यात येईल, असेही ते म्हणाले. जागतिक स्तरावर अनेक देशात भव्य कृषी प्रदर्शने आयोजित केले जातात. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपली दालने लावावीत तसेच आपल्या कृषी आधारित उत्पादनांना नवीन बाजारपेठा शोधाव्यात, असेही ते म्हणाले.

जूनमध्ये झालेल्या ॲग्री हॅकॅथॉनमध्ये पुरस्कार देण्यात आलेल्या 16 नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, उपक्रम प्रत्यक्षात निर्मिती होऊन बाजारपेठेत विक्रीला येण्याच्या दृष्टीने आर्थिक मदत पुरविण्यासाठी बाँबे चेंबर ऑफ कॉमर्स आदी संस्थांनी पुढाकार घ्यावा. तसेच या स्टार्टअपला आयमॅटसारख्या संस्थांनी तांत्रिक, व्यावसायिक मार्गदर्शनासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावावी. हॅकॅथॉनमध्ये प्रदर्शित करण्यात आलेले तंत्रज्ञान कशा प्रकारे शेतापर्यंत जात आहे, त्याचेही संनियंत्रण करावे. पुढील हॅकॅथॉनची तयारी नियोजित वेळेत होईल तसेच त्यात अधिक अचूकता, नवीन बाबी कशा घेता येतील या अनुषंगानेही सूचना कराव्यात आदी सूचना डुडी यांनी दिल्या.

यावेळी  काचोळे यांनी सादरीकरण करुन क्लस्टर पद्धतीने लागवड करण्यात येणाऱ्या पिकांच्या लागवडीबाबत सुरू असलेल्या कामकाजाची माहिती दिली.  मडके यांनी प्रशिक्षण तसेच शेतकरी अभ्यासदौरे आदींच्या अनुषंगाने माहिती दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×