पुण्यात एकाच दिवसांत दोन खूनाच्या घटनेने खळबळ

धायरीत तरुणाच्या डोक्यात बॅट मारून खून

पर्वतीत दाबेली विक्रेत्याचा खून, फुरसुंगीत वडिलांनी मुलाला संपविले

marathinews24.com

पुणे – पुण्यात एकाच दिवसांत दोन खूनाच्या घटनेने खळबळ – शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूतीचा दावा करणारे पुणे पोलीस पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहेत. मागील २४ तासात दोन खूनाच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पर्वती पसिसरात दाबेली विक्रेत्याचा खून करण्यात आला आहे. तर फुरसुंगी परिसरात बापानेच मद्यपी मुलाचा गळा घोटून खून केला आहे. याप्रकरणी पर्वती आणि फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीने फसवणूक केल्याने तरुणाची आत्महत्या – सविस्तर बातमी 

कच्छी दाबेली विक्रेत्या तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करुन खून केल्याची घटना सोमवारी दि. २१ सकाळी घडली. पोलिसांनी पसार झालेल्या हल्लेखोराला अटक केली. दानिश सिद्धिकी (वय २५, रा. पर्वती दर्शन) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. सिद्धीकी कुटुंबीय मूळचे उत्तर प्रदेशातील असून, दानिश त्याचा भाऊ, त्याची पत्नीसह पर्वती दर्शन भागात राहायला आहे. तो हातगाडीवर कच्छी दाबेली विक्री करत होता. सोमवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारासत दानिशच्या घराचा दरवाजा उघडा होता. हल्लेखोर चाकूसह त्याच्या घरात शिरला. दोघांमध्ये झटापट झाल्यानंतर हल्लेखोराने चाकूने दानिशच्या गळ्यावर वार केला.

दानिश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. गंभीर जखमी झालेल्या त्याला तातडीने रहिवाशांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. पसार झालेल्या हल्लेखोराला रहिवाशांनी पकडले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या हल्लेखोराची पोलिसांनी चौकशी केली असता, तो मनोरुग्ण असल्याचे दिसून आले आहे. हल्लेखोराने दानिशचा खून का केला, यामागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पर्वती दर्शन पोलिसांनी दिली.

फुरसुंगीत वडिलांनी मद्यपी मुलाचा गळा आवळून केला खून

मुलाने दारू पिऊन येऊन आई-वडिलांना शिवीगाळ करून झटापटी केली. त्याच रागातून वडिलांनी मुलाला जमिनीवर खाली पाडून कापडी गमजाने त्याचा गळा आवळला. त्यानंतर त्याचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याची घटना २० जुलैला रात्री साडेनउच्या सुमारास वडकीतील वलवा वस्तीनजीक वैâलासनगरात घडली आहे. प्रशांत सुरेश जमदाडे (वय ३५) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी सुरेश बाबुराव जमदाडे (वय ५९ रा. कैलासनगर, वलवा वस्ती, वडकी, हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मनोहर ताबाजी डोके (वय ३६, रा. फुरसुंगी ) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी फुरसुंगी पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×