Breking News
पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईकपुण्यात गंगाधाम रस्त्यावर रासायनिक कंपनीतून गॅस गळतीपर्वती गावात दोघांवर शस्त्राने वारखाण्याच्या पानात भांगमिश्रीत नशेच्या गोळ्यांचा वापरड्रग मुक्त पुणे जनजागृती अभियानाचा शुभारंभजिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी 

गाळे ई-लिलाव प्रक्रियेस १ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

गाळे ई-लिलाव प्रक्रियेस १ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

नागरिकांच्या मागणीनुसार ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याकरिता १ ऑगस्ट २०२५ रात्री ११:५९ वाजेपर्यंत मुदतवाढ

marathinews24.com

पुणे – गाळे ई-लिलाव प्रक्रियेस १ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ – पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत पुणे, सोलापूर, सांगली, सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील विविध योजनांतर्गत ५२ अनिवासी गाळे, २८ कार्यालयीन गाळे ई-लिलाव पद्धतीने वितरित करण्याबाबत २१ जून २०२५ रोजी जाहिरात देण्यात आली होती, तथापि नागरिकांच्या मागणीनुसार ई-लिलाव प्रक्रियेत भाग घेण्याकरिता १ ऑगस्ट २०२५ रात्री ११:५९ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांनी www.eauction.mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

राजाभाऊ नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‌‘महापूर‌’चा प्रयोग – सविस्तर बातमी 

सर्वसाधारण प्रवर्गातील गरजू व पात्र नागरिकांना १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील सोडतीनंतर मागणीअभावी रिक्त राहीलेल्या सदनिका विकासकाकडून प्राप्त अहवालानुसार प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर वितरित करण्याचे नियोजन आहे.

सदनिका वाटपामध्ये पारदर्शकता ठेवण्याच्या हेतूने सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र अर्जदारांना सदनिका वितरित करण्याकरिता https://bookmyhome.mhada.gov.in/ या संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. विकासकांकडून सोडतीनंतर विक्रीअभावी शिल्लक सदनिका जसजशा उपलब्ध होतील तसतशा पडताळणीअंती प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर सर्वसाधारण प्रवर्गामधील गरजू व पात्र लाभार्थ्यांना वितरित करण्याची प्रक्रिया निरंतर सुरु राहणार आहे. गरजू व पात्र लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर नोदणी पूर्ण करुन उपलब्ध सदनिकांसाठी अर्ज करावा.

नजीकच्या काळात करण्याचे अंदाजे २ हजार ५०० सदनिकांची सोडत

याव्यतिरिक्त नजीकच्या काळात पुणे मंडळामार्फत १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजना व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील अंदाजे २ हजार ५०० सदनिकांची सोडत काढण्यात येणार आहे, त्यासंबंधी विकासकांकडून प्रस्ताव प्राप्त होत असून सोडतीबाबतची पुढील प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळाला भेट देवून नोदणी करावी, असे आवाहन पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजी आढळराव पाटील, मुख्य अधिकारी राहूल साकोरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×