Breking News
पर्वती परिसरात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलानवले पूल परिसरात आंदोलनाला बंदीकात्रज–कोंढवा मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी प्राधान्यहडपसरमध्ये बेड्यासह आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसलाभिंतीत अडकलेल्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुटकाकोथरूडमध्ये दूरसंचार विभागाची केबल चोरीलापुणे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल स्वरुपात दिशादर्शक काम करावेभारतातील पहिल्या ‘ईआरपी प्रदर्शनाचे ७ ते ९ मे कालावधीत पुण्यात आयोजनटेम्पो चोरणार्‍या सराईतांना अटक, युनीट सहाची कामगिरीजुन्या वादातून तरूणाचा केला खून, चार अल्पवयीन ताब्यात

अजय देशमुख बनले मस्साजोग गावचे पहिले वकील

अजय देशमुख बनले मस्साजोग गावचे पहिले वकील

संघर्षातून मिळवली यशाची वाट

marathinews24.com

बीड – जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर मस्साजोग गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा अजय जीवन देशमुख यांनी एक प्रेरणादायी वाटचाल पूर्ण करत कायद्याच्या क्षेत्रात यश मिळवले आहे. अजय देशमुख यांनी नुकतीच महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलकडून वकिलीची अधिकृत सनद प्राप्त करून मस्साजोग गावाचे पहिले वकील होण्याचा मान मिळवला आहे.

राजाभाऊ नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‌‘महापूर‌’चा प्रयोग – सविस्तर बातमी 

अजय देशमुख यांचे प्राथमिक शिक्षण मस्साजोग येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले असून, अत्यंत सामान्य आर्थिक परिस्थितीत वाढलेल्या अजयने शिक्षणाकडे कायम गांभीर्याने पाहिले. त्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी अंबाजोगाईला जावे लागले. परंतु लहानपणापासून शिक्षणाची आवड असल्यामुळे हार न मानता शिकत राहिले.

पुण्यातून घेतले उच्च शिक्षण, समाजाचे देखील मिळाले योगदान

कायद्याचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी अजय पुणे गाठले. शिक्षणाचा खर्च भागवताना अनेक अडचणी आल्याच पण अशावेळी मराठवाडा मित्र मंडळ शैक्षणिक संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव सर यांनी त्यांना वेळोवेळी मदत केली. संस्थेच्या वस्तीगृहाची सुविधा मिळवून दिल्यामुळे अजयला पुण्यात राहण्याची सोय झाली. या काळात त्यांनी शिक्षणासोबतच विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला.

मस्साजोग गावातील अजय देशमुख हे पहिलेच कायद्याचे शिक्षण घेऊन वकीली सनद मिळवणारे विद्यार्थी ठरले आहेत. त्यांच्या या यशामुळे गावामध्ये आनंदाचे व अभिमानाचे वातावरण आहे. अजयचे वडील एक अल्पभूधारक शेतकरी आहेत, अजयचे कुटुंब शिक्षणासाठी नेहमीच पाठिशी राहिले. विशेष म्हणजे, अजयच्या शैक्षणिक वाटचालीत दिवंगत सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांचेही मोठे योगदान होते.

सामाजिक न्यायासाठी लढण्याची तयारी

आपल्या यशानंतर अजयने स्पष्ट केले की, समाजातील वंचित, पीडित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी मी कार्यरत राहीन. मिळवलेल्या कायद्याच्या ज्ञानाचा वापर सामाजिक परिवर्तनासाठी करणार आहे. गरजूंसाठी मोफत कायदेशीर मदत पुरवण्याची भावना देखील व्यक्त केला आहे.

कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण

अजय ने मिळवलेल्या यशाबद्दल संपूर्ण देशमुख कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळी आणि संपूर्ण मस्साजोग गावकऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक केले. अजयचे हे यश गावातील तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×