भरधाव दुचाकी घसरली, सहप्रवाशी तरुणाला जीव गमवावा लागला

भरधाव दुचाकीचा अपघात, बाह्यवळण मार्गावर दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

marathinews24

पुणे -भरधाव दुचाकी घसरून सहप्रवासी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागात घडली. भरधाव दुचाकी चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी दुचाकीस्वाराविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
जय भगवान अवघड (वय २२, सध्या रा. अक्षरा पीजी. लक्ष्मी चौक, हिंजवडी फेज एक) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी तरुणाचे नाव आहे. अपघातात दुचाकीस्वार शुभम भाऊसाहेब काकडे (वय २४, सध्या रा. अक्षरा पीजी. लक्ष्मी चौक, हिंजवडी, फेज एक) जखमी झाला आहे. भगवान सुखदेव अवघड (वय ४८,रा. वाकळुनी, ता. बदनापुर, जि. जालना) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जय अवघड मूळचा जालना जिल्ह्यातील वाकळुनी गावचा रहिवासी आहे. रविवारी (३० मार्च) दुपारी साडेबाराच्या सुमारास दुचाकीस्वार शुभम आणि त्याचा मित्र जय हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. वारजे परिसरातील स्वीट काॅर्नर दुकानाजवळ भरधाव दुचाकीस्वार शुभम याचे नियंत्रण सुटले. दुचाकी घसरल्याने सहप्रवासी जय याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तसेच दुचाकीस्वार शुभम हा जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान जयचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक नाईकवाडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top