Breking News
Developed Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवालFodder Shortage Maharashtra 2026 : चारा टंचाईवर मात करण्यासाठी कृषी विभाग सज्जMPSC Group C Exam 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क परीक्षेसाठी पदसंख्येत वाढJyoti Savitri School Khanwadi : महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे विशेष : परिवर्तनाचा नवा दीप : ‘ज्योती सावित्री’ शाळा!Birsa Munda Seva Saptah 2026 : भगवान बिरसा मुंडा गौरव दिवस सेवा सप्ताहातून आदिवासी बांधवांना योजनांचा लाभMahajyoti Pune News : महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसवर दरोडा

चालक, वाहक, प्रवाशांना मारहाण

marathinews24.com

पुणे – बीडला निघालेल्या प्रवासी बसवर दरोडा घालून चोरट्यांनी बसचालकासह वाहक, प्रवाशांना मारहाण करून लुटल्याची घटना नगर रस्त्यावरील बकोरी फाटा परिसरात मध्यरात्री घडली. चोरटे मोटारीतून अहिल्यानगरकडे पसार झाले. याबाबत बसचालक भाऊसाहेब युवराज मिसाळ (वय २६, रा. मयूर नायगाव, ता. पाटोदा, जि. बीड) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठाची २५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहतूक करणारी बस भोसरीहून गुरुवारी रात्री बीडकडे निघाली होती. बस युवराज ट्रॅव्हल्सच्या मालकीची आहे. पुणे-नगर रस्त्यावरील बकोरी फाटा परिसरातील समृद्धी लाॅजजवळ प्रवाशांना घेण्यासाठी बस रात्री पावणेबाराच्या सुमारास थांबली. त्या वेळी चार चोरटे प्रवासी म्हणून बसमध्ये शिरले. चोरट्यांनी प्रवासी हृषीकेश सानप (वय २४, रा. बीड) यांना मारहाण करून पैशांची मागणी केली. त्यानंतर चोरट्यांनी बसचालक मिसाळ यांना धमकावले. चोरट्यांनी त्यांच्या खिशातील साडेपाच हजारांची रोकड काढून घेतली. बसवाहक संतोष ठोकळ (वय ३३, रा. बीड) यांनाही चोरट्यांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील दोन हजार रुपयांची रोकड लुटली. त्यानंतर चोरटे बसमधून खाली उतरले. पाठीमागून आलेली मोटार तेथे थांबली. चोरटे मोटारीतून अहिल्यानगरकडे पसार झाले. मध्यरात्री पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. त्या वेळी बकोरी फाटा परिसरात गर्दी होती. प्रवासी वाहतूक करणारा बसचालक आणि वाहकाने दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×