Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ज्येष्ठाला जखमी अवस्थेत निर्जनस्थळी टाकून रिक्षा चालक पसार

येरवड्यात कोयते उगारून टोळक्याची दहशत

वेळेत उपचार न मिळाल्याने ज्येष्ठाचा मृत्यू

पुणे – बाणेर भागात रिक्षा चालकाने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी घेऊन जातो, अशी बतावणी करून रिक्षाचालकाने रिक्षात बसवले. त्यानंतर खडकीतील रेंजहिल्स परिसरात रेल्वे रूळाजवळ त्यांना जखमी अवस्थेत सोडून रिक्षाचालक पसार झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने ज्येष्ठाचा मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षा चालकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र परिसरातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा-उपमुख्यमंत्री अजित पवार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ज्येष्ठ नागरिक हे काही कामानिमित्त बाहेर पडले. बाहेर पडताना त्यांनी पत्नीला सांगितले. त्यानंतर सायंकाळी सातपर्यंत ते घरी परतले नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी नातेवाईक, तसेच निकटवर्तीयांकडे चौकशी केली. वडील घरी न परतल्याने मुलगा तक्रार देण्यासाठी बाणेर पोलीस ठाण्यात गेला. तो पोलिसांबरोबर बालेवाडी फाटा परिसरात गेला. त्यांनी बालेवाडी फाटा चौकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. तेव्हा सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास बाणेर परिसरातील बालेवाडी फाटा चौकातील न्यू पूना बेकरीसमोर रस्ता ओलांडणाऱ्या मुलाच्या वडिलांना रिक्षा चालकाने धडक दिल्याचे दिसून आले. चित्रीकरणात वडील जखमी झाल्याचे आढळले. अपघातानंतर तेथे गर्दी झाली. नागरिकांकडून चोप बसेल, अशी भीती वाटल्याने रिक्षा चालकाने ज्येष्ठ नागरिकाला रिक्षातून रुग्णालयात घेऊन जातो, असे नागरिकांना सांगितले. गंभीर जखमी अवस्थेतील ज्येष्ठ नागरिकाला बालेवाडी फाटा परिसरातून रिक्षातून घेऊन विरुद्ध दिशेने बाणेरकडे गेला.

सारा घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपला होता.
त्यानंतर २१ जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास खडकीतील रेंजहिल्स परिसरात रेल्वे रुळाजवळ गवतात ज्येष्ठ नागरिक जखमी अवस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दुपारी चारच्या सुमारास पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाच्या मुलाशी संपर्क साधला. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे निष्पन्न झाले. मुलाने रिक्षा चालकाविरुद्ध फिर्याद दिली.गंभीर जखमी अवस्थेतील ज्येष्ठ नागरिकाला मदत न करता त्यांना जखमी अवस्थेत निर्जनस्थळी सोडून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पसार झालेल्या रिक्षा चालकाचा बाणेर पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

रेल्वे काॅलनीत घरफोडी; ३ लाखांचा ऐवज लंपास

ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे काॅलनीतील घरातून चोरट्यांनी तीन लाख ८ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ताडीवाला रस्त्यावरील रेल्वे काॅलनीत राहायला आहेत. त्यांनी घरासमोरील पादत्राणे ठेवण्याच्या लोखंडी जाळीत घराची चावी ठेवली होती. चोरट्यांनी लाेखंडी जाळीत ठेवलेली चावी घेऊन घराचे कुलूप उघडले.

चोरट्यांनी कपाट उचकटून तीन लाख ८ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. तक्रारदार कामावरुन घरी परतले. तेव्हा घराचे कुलूप उघडल्याचे लक्षात आले. कपाटातील दागिने लांबविण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली.
तक्रारदाराच्या घरात चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; खराडी बाह्यवळण मार्गावर अपघात

डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना खराडी बाह्यवळण मार्गावर घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक राजाराम कोहिनकर (वय ५१, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी डंपरचालक फिरोजखान पठाण (रा. कौंडगाव, जि. परभणी) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. कोहिनकर यांची पत्नी गीता (वय ४४) यांनी खराडी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार कोहिनकर हे शुक्रवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास खराडी बाह्यवळण मार्गावरुन निघाले होते. त्या वेळी साईनाथ चौकात भरधाव डंपरने दुचाकीस्वार कोहिनकर यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या कोहिनकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक सावन आवार तपास करत आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. बंदी आदेश धुडाकावून डंपर, ट्रक, सिमेंट मिक्सर अशी अवजड वाहने सर्रास शहरातून ये-जा करत असल्याचे दिसून आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×