Breking News
पीएमपीएल बसप्रवासात ज्येष्ठ महिलेची बांगडी चोरीलापुण्यात गर्दीत महिलांचे दागिने लांबविलेPune MLC Election 2026 : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची द्विवार्षिक निवडणूक २३ ऑक्टोबरलाGender Equality Maharashtra : लिंग समानतेसाठी कालबद्ध कृती आराखडा राबवाLuxury Bus RTO Action : परराज्यात नोंदणी असलेल्या लक्झरी बसविरुद्ध पिंपरी-चिंचवड आरटीओची विशेष तपासणी मोहीमNanded Pistol Arrest : पिस्तूल बाळगणार्‍या दोघांना अटक, युनीट तीनची कामगिरीPune Drought Management : जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावाNaval Kishore Ram Birthday : आयुक्त नवल किशोर राम यांचा वाढदिवसानिमित्त सत्कारगणेशोत्सवात विज्ञानाचा जागर; शिवाजी मंदिर मंडळाच्या चंद्रयान व तारांगण शोला उत्स्फूर्त प्रतिसादPune MLC Election 2026 : पुणे पदवीधर व पुणे शिक्षक मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबरला मतदान

केळी व सूर्यफूल पीक लागवडीकरिता तंत्रज्ञानाचा वापराबाबत कृषी विभागाचे आवाहन

कृषी विभागा

तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांचे आवाहन 

marathinews24.com

बारामती – ‘दिशा कृषी उन्नतीची-२०२९’ अंतर्गत अधिकाधिक शेतकऱ्यांनी केळी उत्पादन पद्धती व निर्यात तसेच सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान मास्टर ट्रेनर प्रशिक्षणाअंतर्गत क्षेत्र वाढ, उत्पादन तंत्रज्ञान, काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सचिन हाके यांनी केले. (केळी व सूर्यफूल पीक लागवडीकरिता तंत्रज्ञानाचा वापराबाबत कृषी विभागाचे आवाहन)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब’चा शुभारंभ – सविस्तर बातमी 

कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे आदर्श केळी उत्पादन पद्धती व निर्यात तसेच सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान मास्टर ट्रेनर प्रशिक्षण अंतर्गत क्षेत्र वाढ, उत्पादन तंत्रज्ञान, काढणी पश्चात तंत्रज्ञान व विक्री व्यवस्था विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण वर्ग संपन्न झाले. यावेळी जळगाव येथील केळी संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अरुण भोसले, प्रगतशील शेतकरी तथा केळी रत्न कपिल जाचक, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संतोष करंजे, बारामती ॲग्रो स्टार शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक योगेश खोमणे, ॲग्रो इंडस्ट्रीजचे संचालक अमित भोसले, आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक विश्वजीत मगर, सर्व मंडळ कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी,सहाय्यक कृषी अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

हाके म्हणाले, या दोन दिवसीय प्रशिक्षणांमध्ये शेतकऱ्यांना केळी उत्पादन पद्धती व निर्यात तसेच सूर्यफूल लागवड तंत्रज्ञान मास्टर ट्रेनर प्रशिक्षण अंतर्गत क्षेत्र वाढ, उत्पादन तंत्रज्ञान, काढणी पश्चात तंत्रज्ञानाचा वापर करुन लागवड ते प्रक्रिया या हेतूनुसार उत्पादन वाढीसाठी काय करावे याबाबत सविस्तर माहिती दिली.

डॉ. अरुण यांनी तंत्रशुद्ध केळी लागवड तंत्रज्ञान व किड रोग व्यवस्थापन विषयी तर श्री.जाचक यांनी निर्यातक्षम केळी उत्पादन तंत्रज्ञान, निर्यातक्षम केळी उत्पादनासाठी वापरण्यात येणारी अवजारे कृषी निविष्ठा, बागेत काम करताना घ्यावयाची काळजी तसेच निर्यात करण्याच्याअनुषंगाने माहिती दिली. करंजे यांनी तंत्रशुद्ध सूर्यफूल लागवडीबाबत तसेच वैभव कुडाळे यांनी सूर्यफुलाच्या काढणी पश्चात तंत्रज्ञानानंतर लाकडी तेल घाण्याद्वारे तेल निर्मिती आणि त्या शासकीय योजना अनुदानाविषयी माहिती दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×