चंदननगर परिसरातील घटना
marathinews24.com
पणे – पुण्यात भरदिवसा सराफी पेढीत लूट – चंदननगर भागातील एका सराफी दुकानात शिरून चोरट्यांनी शस्त्राचा धाक दाखवून सराफी पेढीतून तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी चंदननगर पोलीस ठाण्याच्या नूतन इमारतीचे उद्घाटन कररण्यात आली. उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर सराफी पेढीच्या मालकाला धमकावून लुटमारीची घटना घडल्याने खळबळ उडाली.याबाबत सराफी पेडीच्या मालकाने चंदनगनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांना राखी बांधत भगिनींकडून लव्ह जिहादविरोधी कायद्याची मागणी – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर भागातील साईनाथनगर भागात आशापुरी ज्वेलर्स सराफी पेढी आहे. सराफी पेढीचे मालक शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास पेढीत होते. त्या वेळी दुचाकीवरुन आलेले चोरटे सराफी पेढीत शिरले. त्यांनी चेहरे रुमालाने झाकले होते. चोरट्यंनी शस्त्राचा धाक दाखविला. पेढीतील तीन ग्रॅमच्या सोन्याच्या बाळ्या घेतल्या. सराफी पेढीच्या मालकांनी चोरट्यंना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरडा केला. चोरट्यांच्या अंगावर स्टुल फेकून मारला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. आरडाओरडा ऐकून नागरिकांनी सराफी पेढीत धाव धेतली नागरिकांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
चंदननगर भागातील साईनाथनगर परिसर गजबलेला आहे. खराडी बाह्यवळण मार्गाजवळ साईनाथनगर आहे. चंदननगर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाइन पद्धतीने शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमात केले. उद्घाटनानंतर चंदननगर भागातील सराफी पेढीच्या मालकांना धमकावून दागिन्यांची लूट केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी साईनाथनगर परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.























