Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

शिकारीसाठी लावलेल्या लोखंडी सापळ्यातअ डकलेल्या बिबट्याच्या मादीची सुटका

पुणे जिल्ह्यातील दाैंडमधील घटना

marathinews24.com

पुणे – ऊसाच्या शेतात शिकारीसाठी लावलेल्या लोखंडी सापळ्यात अडकलेल्या बिबट्याच्या मादीची पुणे वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबलच्या संयुक्त प्रयत्नांतून यशस्वी सुटका करण्यात आली. या मादीवर सध्या बावधन येथील वाइल्डलाईफ ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर येथे सखोल वैद्यकीय उपचार सुरू आहेत. गेल्या तीन वर्षांत दौंड परिसरात बिबट्याच्या अशा प्रकारे सापळ्यात अडकण्याची ही तिसरी घटना असून, या प्रकारामुळे अवैध आणि धोकादायक सापळ्यांचा वापर अजूनही सुरू असल्याबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. नांदगाव (ता. दौंड) येथील रानात घटना घडली.

पुण्यातील टिळक रस्त्यावरील गणेश विसर्जन मिरवणूक लवकर संपविण्याचा निर्णय – सविस्तर बातमी

ऊसाच्या शेतात शिकारीसाठी लावलेल्या लोखंडी सापळ्यात अडकलेल्या बिबट्याची मादी अडकली असल्याचे नांदगाव ग्रामपंचायतीचे सरपंच अनिकेत शिंदे यांच्या सकाळी दहा वाजता ध्यानात आले. त्यांनी तत्काळ दौंड क्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना कळविल्यानंतर वन विभाग आणि रेस्क्यू ट्रस्टचे स्थानिक सदस्य घटनास्थळी पोहोचले. पुण्याहून रेस्क्यू ट्रस्टचे ‘रॅपिड रिस्पाॅन्स युनिट’ दुपारी साडेबारा वाजता घटनास्थळी दाखल झाले.

शिकारीसाठी लावलेल्या लोखंडी सापळ्यातअ डकलेल्या बिबट्याच्या मादीची सुटका

सुमारे सहा वर्षे वयाची ही बिबट्याची मादी आपल्या पुढच्या डाव्या पायात घट्ट अडकलेल्या लोखंडी सापळ्यात सापडली होती. रात्रभरच्या धडपडीमुळे ती खूप थकलेली दिसत होती. बिबट्याला दुपारी सव्वाच्या सुमारास भूल देऊन सुरक्षितपणे सापळ्यातून मुक्त करण्यात आले आणि लगेचच प्राथमिक वैद्यकीय उपचार करण्यात आले. रेस्क्यूच्या वरिष्ठ पशुवैद्यक डॉ. कल्याणी ठाकूर यांनी घटनास्थळी वैद्यकीय उपचारांचे नेतृत्व केले.

रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे वन्यजीव व्यवस्थापन संचालक तुहिन सतारकर म्हणाले, ‘या बचाव मोहिमेवरून समन्वित प्रतिसादाचे महत्त्व अधोरेखित होते. ग्रामपंचायतीकडून मिळालेली माहिती, वनविभागाचे त्वरित पाऊल आणि आमच्या कार्यकर्त्यांचा समन्वय यामुळे बिबट्याला वेळेवर मदत करता आली.”

या बचाव मोहिमेमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे, फौजदार योगीता वीर, वनरक्षक सोनल चव्हाण यांच्यासह रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे तुहिन सातारकर, अमित तोडकर, नचिकेत अवधानी, श्रेयस कांबळे, अभिलाष बनसोड, डॉ. कल्याणी ठाकूर, सागर शिंदे, प्रज्वल गायकवाड हे सदस्य तसेच शिरूर येथील गोविंद शेलार यांनी सहभाग घेतला.

बिबट्याच्या मादीचा पाय  घट्ट अडकलेला होता. मोठ्या प्रमाणात सूज आणि जखम दिसून आली. तिला पुण्यातील बावधन येथील वाइल्डलाईफ ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. तेथे तिच्यावर सध्या बारकाईने वैद्यकीय निरीक्षण सुरू आहे. पुढील तपासणीसाठी एक्स-रे केले जातील.

डॉ. कल्याणी ठाकूर, वरिष्ठ पशुवैद्यक, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट

अशा प्रकारचे लोखंडी सापळे अमानवी असून, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ नुसार पूर्णतः बेकायदेशीर आहेत. स्थानिक नागरिकांनी असे प्रकार लक्षात येताच तात्काळ वनविभागाला कळवावे, जेणेकरून कठोर कारवाई करता येईल. या घटनेची अधिकृत चौकशी सुरू असून, या प्रकरणात दोषी असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहोत. – महादेव मोहिते, उपवनसंरक्षक, पुणे वन विभाग

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×