Breking News
बस प्रवासादरम्यान चोऱ्या करणाऱ्या दोन महिलांना अटकतब्बल ३६ तोळे दागिने तक्रारदारांना केले परतउपमुख्यमंत्री यांच्या हस्ते श्याम दौंडकर लिखित धडपड भाग-३ या पुस्तकाचे प्रकाशनराज्यातील पहिल्या महसूल लोक अदालतीचे उद्घाटनशेतजमिनीशी निगडित प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लोकअदालतीचे आयोजन करा-महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेमुद्रांक शुल्क अभय योजनेस मुदतवाढीबाबत प्रस्ताव सादर करा – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभहवेत शस्त्रे फिरवून आम्हीच इथले भाई म्हणत घातला राडादिव्यांग विद्यार्थ्यांसाठी येरवडा येथील शासकीय संस्थेत मोफत प्रवेशमाजी सैनिकांनी नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणीचे अवाहन

पुण्यात दुचाकी वाहनांची पुन्हा तोडफोड..

पाटील इस्टेट भागात वाहनांची तोडफोड, टोळके पसार..

Marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात टवाळखोराकडून वाहन तोडफोड करीत परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. अशीच वाहन तोडफोड मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट भागातील महात्मा गांधी वसाहतीत झाली आहे. टोळक्याने कोयते उगारून तीन ते चार दुचाकींची तोडफोड केल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

राजजूनी फौजानसिंग याच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सय्यद नूरजहाँ इराणी (वय ५६, रा. महात्मा गांधी वसाहत, पाटकर प्लाॅट, पाटील इस्टेट,) यांनी खडकी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रवाजे उघडे ठेवणे पडले महागात सव्वातीन लाखाची चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजजूनी आणि साथीदार बुधवारी रात्री महात्मा गांधी वसाहतीत शिरले होते. कोयते उगारून त्यांनी परिसरात नागरिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी दहशत माजवून वसाहतीत लावलेल्या तीन ते चार दुचाकींची तोडफोड केली. दहशत माजवून आरोपी पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत. दरम्यान, वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी येरवडा भागात टोळक्याने कोयते उगारुन दहशत माजविली होती. नागरिकांच्या घरावर कोयते आपटून आरोपी पसार झाले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top