इमारतीचे बांधकाम डिसेंबर 2025 अखेर पर्यंत पुर्ण करुन देण्याबाबत आदेश
marathinews24.com
पुणे – शहरातील शिवाजीनगर येथे बांधण्यात येत असलेल्या “कामगार भवन” इमारतीच्या बांधकामाची कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पाहणी करून सद्य स्थितीबाबत माहिती घेवून संबंधितांना इमारतीच्या बांधकामाबद्दल सूचना दिल्या. मंत्री फुंडकर यांनी इमारत बांधकामाचे कंत्राटदार रवी शिंदगे यांना इमारतीचे बांधकाम डिसेंबर 2025 अखेर पर्यंत पुर्ण करुन देण्याबाबत आदेश दिले. यावेळी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभाग, कामगार विभाग, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचानालयाच्या अधिकाऱ्यांना कामगार भवनाचे बांधकाम वेळेत पूर्ण करुन घेण्याबाबत कंत्राटदाराकडे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यासोबत समन्वय साधून वेळोवेळी पाठपुरावा करण्याची सूचनाही त्यांनी दिली.
पुण्यातील आंबेडकरी चळवळीचे नियोजित ठिय्या आंदोलन 15 ऑगस्टला होणार – सविस्तर बातमी
“कामगार भवन” इमारतीमध्ये अपर कामगार आयुक्त, पुणे विभाग, पुणे, कामगार उप आयुक्त, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, पुणे, बाष्पके संचलनालय, पुणे आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळ, पुणे आदी कार्यालयांचा समावेश असणार आहे.
या पहाणीवेळी कामगार विभागाचे अपर कामगार आयुक्त बाळासाहेब वाघ, कामगार उप आयुक्त (प्र.) निखिल वाळके, अधीक्षक अभियंता भरत कुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता डॉ. सुरेंद्रकुमार काटकर, डिश व बाष्पके संचालनालयाचे अधिकारी व मे. ओंकार कन्स्ट्रक्शन, (कंत्राटदार) उपस्थित होते.























