Breking News
गोसंवर्धनासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणीकोरियन वाणिज्य दूतावासातर्फे २८ जून रोजी पुण्यात ‘क्विझ ऑन कोरिया २०२६’ची प्राथमिक फेरीमहाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णयप्रतिबंधित १३ लाखांचा पानमसाला, तंबाखूचा साठा जप्तमहाराष्ट्रदिनी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे पुण्यात ‘लोकशाही संवाद’पुण्यात भरधाव ट्रॅव्हल्सची दुचाकीला धडक; दोन महिला जखमीपुण्यात क्लोरिन सिलेंडरमध्ये तयार झाल्याने विषारी वायू पसरलाआयटी कंपनीत मॅनेजर असल्याची बतावणीने ड्रायव्हरने केले लग्नपुण्यातील १४ जणांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्हनाथजलचे थंडगार पाणी १५ रुपयांलाच दिले पाहिजे – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

गणेशोत्सवात विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे नियुक्ती आदेश जारी

अपर जिल्हा दंडाधिकारी

अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी केले आदेश जारी

marathinews24.com

पुणे – सार्वजनिक गणेशोत्सव शांततामय वातावरणात पार पाडावा, गणपती विसर्जन मिरवणूका रात्री उशिरापर्यंत चालू असल्याने या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये, याकरिता तालुका स्तरावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्तीबाबत अपर जिल्हा दंडाधिकारी ज्योती कदम यांनी आदेश जारी केले आहे.

कामगार मंत्र्यांनी केली ‘कामगार भवन’ इमारतीची पाहणी – सविस्तर बातमी 

सार्वजनिक गणेशोत्सव 27 ऑगस्ट 2025 रोजी सुरुवात होणार असून 6 सप्टेंबर 2025 अनंत चतुदर्शीच्या दिवशी सांगता होणार आहे.जिल्ह्यामध्ये साधारणत: 5 व्या, 7 व्या, आणि 9 व्या दिवशी गणपती विसर्जन होतात. मोठ्या मंडळांचे दहाव्या, अनंत चतुर्शीच्या दिवशी गणपती विसर्जन केले जाते. या दिवशी गणेश विसर्जन मिरवणूका मोठ्या प्रमाणात निघतात. तसेच ठिकठिकाणी नागरिक मोठ्या प्रमाणावर गर्दी करीत असतात, याबाबीचा विचार करता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता – 2023 च्या कलम 14 नुसार तालुका स्तरावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती केल्याचे आदेशात नमूद केले आहे.

पुणे।जिल्ह्यात ड्रोन कॅमेराद्वारे चित्रीकरणाला प्रतिबंध

पुणे जिल्ह्यात कोणत्याही खाजगी व्यक्ती, कार्यक्रम व्यवस्थापन (इव्हेंट मॅनेजमेंट) व छायाचित्रण करणाऱ्या व्यावसायिकांनी ड्रोन कॅमेराचा वापर करताना त्याची पूर्व माहिती ७ दिवस आधी संबंधित पोलीस ठाण्यास कळवून संबंधीत प्रभारी पोलीस अधिकाऱ्यांची रितसर परवानगी घेणे बंधनकारक राहील, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, केंद्रीय संस्था असून दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहळणी होवून त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दौंड, बारामती, शिरुर तालुक्याच्या परिसरामध्ये रात्रीच्या वेळी ड्रोन उडत असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत असून नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळू माफिया देखील टेहळणीसाठी ड्रोनचा वापर करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ड्रोनच्या मध्यमातून टेहाळणी करुन इतर प्रकारच्या चोऱ्याही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे हे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

हे आदेश 12 ऑगस्ट 2025 पासून पुढील दोन महिन्यांसाठी लागू राहतील. आदेशाचा भंग करुन पोलीसांच्या परवानी शिवाय कोणताही व्यक्ती ड्रोन कॅमेरादवारे चित्रीकरण करताना आढळून आल्यास अशी व्यक्ती भारतीय न्याय संहितेचे कलम २३३ प्रमाणे दंडनीय कारवाईस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×