Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

मद्यधुंद अवस्थेत घातला राडा, दोन तरूणींसह चौघांवर गुन्हा

घरात चोरी करणार्‍या केअर टेकरला अटक

विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मद्यधुंद अवस्थेत विमाननगर येथील ईस्ट कोर्ट इमारती समोर मोठ मोठ्याने आरड ओरडा करून गैरवर्तन केल्याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे. हा प्रकार १३ ऑगस्ट रोजी मध्यरात्री पावणे एक वाजण्याच्या सुमारास घडला.

शेअर ट्रेडींगसह फॉरेक्स ट्रेडींगचे आमिष दोन घटनेत ६९ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

याप्रकरणी द्रवेश दिलीप पलांडे (३१, रा. सदगुरूनगर, जगताप बिल्डींग, बिबवेवाडी), अक्षय बापु म्हस्के (२५, रा. आंबेगाव पठार, साई सिध्दी चौक, पुणे), स्नेहल अतुल रसाळ (२८, रा. साईनगर, रेल्वेगेट शेजारी, कासारवाडी) आणि कयन अक्षय म्हस्के (२३, रा. आंबेगाव पठार) यांच्यावर विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपासई अजय दिंगंबर वाघ यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

७० किलो तांब्याची तार चोरी

खांबावरील रोहित्र खाली पाडून त्यातील २०० लिटर ऑईल सांडवून ७० किलो ताब्यांची तार चोरी कयन नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार माळवाडी येथील आष्टापूर गाव येथे हा प्रकार घडला. याबाबत गणेश हणुमंत धुमाळ (३४, रा. कृष्णछाया सोसायटी, डाळींबरोड, उरूळी कांचन, ता. हवेली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला.

गावठी बनावटीचा कट्टा बाळगल्याप्रकरणी अटक

बेकायदेशिररित्या गावठी बनावटीचा कट्टा बाळगल्याप्रकरणी एकाला भारती विद्यापीठ पोलिसांनी सर्प उद्यानाकडून मोरे बाग बस स्टॉपकडे जाणार्‍या रोडवरून पिस्तुलासह ताब्यात घेण्यात आले. तौकीर रफिक शेख (१९, रा. कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील अमंलदार मितेश दत्तात्रय चोरमोले यांनी तक्रार दिली आहे.

दुसर्‍या गुन्ह्यात खडक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोकशाही अण्णाभाऊसाठेनगर येथील पीएमसी कॉलनी येथे बेकायदेशिररित्या देशी बनावईचे पिस्तुल आणि जिवंत काडतुस बाळगणार्‍या एकाला अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ही कारवाई केली. किरण उर्फ दादाराव दौलत कांबळे (२९, रा. साठेनगर, गंजपेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार विठ्ठल साळुंखे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×