Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टरच्या हॉस्पिटलची तोडफोड

भाजप महिला आघाडीकडून सुश्रुत घैसास यांच्या वडीलांच्या हॉस्पिटलचे नुकसान

Marathinews24.com

पुणे– पैशासाठी गर्भवती महिलेवर उपचार न केल्यामुळे भाजपचे विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक सुशांत भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. तनिशा भिसे यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाकडून उपचारासाठी पैशांची अडवणूक केली. त्यामुळे आमच्या मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. याप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाबाबत संतप्त प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्यापार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

डेटिंग ॲप वरून झालेली ओळख पडली महागात सव्वा लाखात – सविस्तर बातमी
रुग्णालयात प्रशासनाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुणे शहरातील ठाकरे गटाचे आणि शिंदे गटाचे पदाधिकारी आमनेसामने आले होते. रुग्णालय प्रशासनाने विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत कारवाईची मागणी केली. आंदोलना दरम्यान दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडकीकर प्रसार माध्यमांसमोर भूमिका मांडण्यास आले होते. त्यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिरीष याडकीकर यांच्या तोंडावर चिल्लर फेकल्याची घटना घडली. तर ही घटना थांबत तोवर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बोर्डला पतितपावन संघटनेकडून काळे फासून निषेध नोंदविण्यात आला आहे. त्यानंतर भाजप महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा हर्षदा फरांदे यांनी रुग्णालयात समोर आंदोलन केले. तनिशा भिसे यांच्या कुटुंबियांना उपचारासाठी १० लाख रुपये भरावे लागतील,अशी मागणी करणार्‍या सुश्रुत घैसास यांच्या वडिलांचे अश्विनी नर्सिंग होमची तोडफोड करीत केली.

सुश्रुत घैसास हा माझा मुलगा आहे. पण त्याचा या रुग्णालयाशी काही संबंध नाही. विनाकारण आमच्या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली. आमच्या परिवाराला त्रास दिला जात आहे. मी आणि माझे पती तसेच दुसरा मुलगा ४० वर्षापासून रुग्णालय चालवत आहोत . त्याने रुग्णालयाच्या नियमानुसार पैसे मागितले असतील. – डॉ. नीलिमा घैसास

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×