Breking News
जिल्हा परिषद सदस्याची विकासात्मक दृष्टी ठरेल ग्रामविकासाला नवी चालना देणारी सुदृढ स्नायू, सुडौल शरीरासाठी ‘वंडर एक्सॉन’ तंत्रज्ञान प्रभावीपुण्यात सराईत गुंडाचा मित्रांकडून खूनपुणे पोलीस नियंत्रण कक्षातील गैरहजरी भोवलीतब्बल ६० लाखांचा गुटखा जप्तउष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचा बचाव करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबिनव्याजी कर्जाचे आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूकग्राहकांच्या तक्रारीची गांर्भीयाने दखल घेत प्राधान्याने सोडावाव्यातविवाहितेला प्रेमात फसवले, अपमानित झाल्याने महिलेने केली आत्महत्यापॉर्न व्हिडिओ का पाठवले, पुण्यात बतावणीने जेष्ठाला ३५ लाखांना गंडा

भरधाव वाहन चालकाच्या धडकेत झोपलेला तरूण ठार

बाह्यवळण मार्गावर अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू

मंतरवाडी कचरा डेपोसमोरील गोदामाजवळ घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहन चालकाने गोदामाजवळ झोपलेल्या तरूणाला धडक दिल्यामुळे संबंधिताचा मृत्यू झाला आहे. हा अपघात १७ ऑगस्टला दुपारी एकच्या सुमारास मंतरवाडी कचरा डेपोसमोरील गोदामाजवळ घडली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूद्ध फुरसुंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गणेश ज्ञानेश्वर जाधव (वय ३१ रा. सटलवाडी, पुरंदर) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी मुकेश जाधव (वय ३६, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

शेअर ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक पडली 35 लाखांना; सायबर चोरट्यांकडून तरुणाला गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश जाधव हा १७ ऑगस्टला दुपारी एकच्या सुमारास मंतरवाडी कचरा डेपोसमोरील गोदामाजवळ झोपला होता. त्यावेळी अज्ञात वाहन चालकाने त्याला धडक दिल्यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. दरम्यान, भरधाव वाहन चालकाचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार तपास करीत आहेत.

बसप्रवासात महिलेचे ६६ हजारांचे मंगळसूत्र चोरीला

पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ६६ हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना १३ ऑगस्टला सकाळी साडेआठच्या सुमारास वाकडेवाडी बसस्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी बावधन बुद्रूक परिसरात राहणार्‍या महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बावधन बुद्रूक परिसरात राहायला असून, १३ ऑगस्टला सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास महिला वाकडेवाडी बसस्थानकात आलेल्या बसमध्ये प्रवेश करीत होती. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन महिलेच्या गळ्यातील ६६ हजारांचे मंगळसूत्र चोरून नेले. काही अंतरावर महिलेला गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी खडकी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस अमलदार पवार तपास करीत आहेत.

जीवे मारण्याची धमकी देउन ट्रक चोरला, दोघांना अटक

पुणे – चालकाला जीवे मारण्याची धमकी देउन त्याच्याकडून चावी घेउन ५० लाखांचा ट्रक चोरणार्‍या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २० ऑगस्टला रात्री एकच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गालगत बालाजी सिमेंट वेअर हाउसजवळ घडली आहे. मल्लीकार्जुन शांताप्पा अवंती (वय ३३) आणि अशोक शिवाप्पा राठोड (वय ३९, दोघेही रा. विजापूर, कर्नाटक) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनुजकुमार रामसुरत (वय २४, रा. उत्तरप्रदेश) याने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनुजकुमार हा ट्रक चालक असून, तो २० ऑगस्टला अशोक लेलंड ट्रक क्रमांक (बीआर २४ जीडी २७७८) गाडी घेउन लोणी काळभोर परिसरातून जात होता. त्यावेळी आरोपी मल्लीकार्जुन आणि अशोक राठोड यांनी चालकाला धमकावले. त्याला जीवे मारण्याची धमकी देउन त्याच्याकडील ट्रकची चाकी घेउन ५० लाखांचा ट्रक चोरून नेला. याप्रकरणी अनुजकुमारने तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी दोघा आरोपींचा माग काढून त्यांना अटक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×