तर फ्रेशर पार्टी आयोजकांचा परवाना रद्द करू

तर फ्रेशर पार्टी आयोजकांचा परवाना रद्द करू

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा

marathinews24.com

पुणे – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर पार्टीसाठी इव्हेंट मॅनेजमेंट केले जाते. संबंधित पार्टीत गैरप्रकार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा थेट परवाना रद्द करण्याचा इशारा दिला आहे. तसेच अल्पवयीनांना मद्य विक्री केल्याचे आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘नाचून नाही, तर वाचून गणेशोत्सव साजरा करा‌’ – सविस्तर बातमी 

पुण्यात मुंढव्यातील पिंगळे वस्ती परिसरात पबमध्ये फ्रेशर्स पार्टीचे आयोजित केली होती. मात्र, पोलीस, उत्पादन शुल्क विभागाची परवानागी घेण्यात आली नव्हती. पार्टीतील मद्यपी तरुणांनी रस्त्यात मद्याच्या बाटल्या फोडल्याच्या घटनेनंतर स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते. त्यांनी पबचालकाला जाब विचारल्याने वादवादाची घटना घडली होती. त्यानतंर शनिवारी (दि. २३) मध्यरात्री राजा बहाद्दुर मिल परिरसातील हॉटेल किकी येथेही पार्टीचे आयोजन केले होते. संबंधित पार्टीत १०० ते १५० महाविद्यालयीन तरुण-तरुणी सहभागी झाले होते. विद्यार्थी अल्पवयीन असताना त्यांना मद्य विक्री केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला होता. संबंधित पब, हॉटेल मालकाने पोलीस, तसेच उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेतली नसल्याचे चौकशीत उघड झाले. त्यानंतर या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

शहरात काही बार, पबमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या नियमांवलीचे उल्लंघन करुन अल्पवयीनांना मद्य विक्री करीत आहेत. हॉटेल, पब चालकांनी अल्पवयीनांना प्रवेश देण्यापूर्वी त्यांच्याकडील कागदपत्रांची पडताळणी करणे गरजेचे आहे. अल्पवयीनांकडे असलेल्या डीजी लॉकर सुविधेतील कागदपत्रे तपासण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पार्टीत महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होत असल्यास त्यांना परावृत्त करावे. त्याबाबत महाविद्यालयांना सूचना द्यावी. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने असा कार्यक्रम आयोजित केल्यास त्यांच्याविरुद्ध फौजदारी कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे.

किकी पबमधील फ्रेशर्स पार्टीप्रकरणी गुन्हा दाखल

महाविद्यालयीन तरुण तरुणींसाठी पार्टी आयोजित केल्याप्रकरणी राजाबहादूर मिलमधील किकी पबवर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी अमित बधे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निखिल प्रकाश सुर्वे (वय ४२, रा. बोरीवली पूर्व, मुंबई), रोहन रमेश सावंत (वय ३९, रा. खराडी), उपेंद्र संजय जुवेकर (वय २६, रा. सोमवार पेठ), सुदर्शन फटाके (वय २२, रा. पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आयोजकांनी इव्हेंट संदर्भात कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता विना परवाना प्रâेशर्स पार्टीचे आयोजन केले. पार्टीसाठी १०० ते १५० मुला मुलींना आमंत्रित केले होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×