Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

लहानग्यांनी साकारली ‘बाप्पा’ची मूर्ती

लहानग्यांनी साकारली 'बाप्पा'ची मूर्ती

कोथरूडमध्ये शाडू मातीची गणेश मूर्ती कार्यशाळा उत्साहात

marathinews24.com

पुणे – लहानग्यांनी स्वतःच्या हातांनी आपल्या लाडक्या बाप्पाला आकार, रंग देत शाडू मातीच्या सर्वांगसुंदर अशा गणेशमूर्ती साकारल्या. सर्जनशील हातांना संस्काराची जोड देत पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने कोथरूडमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजिली होती. कोथरूड विधानसभा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा हर्षाली दिनेश माथवड यांच्या पुढाकाराने डहाणूकर मैदानात ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.

मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करावेत – सविस्तर बातमी 

कार्यशाळेत लहानग्यांसह पालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तज्ज्ञांनी प्रात्यक्षिकांसह मुलांना गणेश मूर्ती घडविण्याची कला शिकवली. गणेश मूर्ती बनविण्यासाठी सर्वांना आयोजकांकडून शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली. कार्यशाळेतून घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचा संदेश, तसेच पर्यावरणपूरक मूर्ती निर्मितीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहचवण्यात आले. खेळीमेळीचे वातावरण, स्वतःच्या हातांनी मूर्ती घडविण्याचा आनंद आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश तिन्हींचा सुंदर संगम या उपक्रमात अनुभवायला मिळाला.

“गणेशोत्सव हा आपला सांस्कृतिक आणि सामाजिक सण आहे. पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाचे स्वागत करणे ही आजची गरज आहे. कार्यशाळेमुळे लहानग्यांना सर्जनशीलतेसोबत संस्कारांची शिकवण मिळाली. नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवल्याचे समाधान आहे. पुढेही अशा उपक्रमांतून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करत राहीन,” अशी भावना हर्षाली माथवड यांनी व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×