बसमध्ये तरुणाची सोन्याची चेन चोरणाऱ्या दोघांना बेड्या

बसमध्ये तरुणाची सोन्याची चेन चोरणाऱ्या दोघांना बेड्या

पर्वती पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पीएमपील बसमधील गर्दीचा फायदा घेऊन तरुणाच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरी करणार्‍या दोघांना पर्वती पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून दोन तोळे वजनाची सोन्याची साखळी जप्त करण्यात आली आहे. अमर शंकर जाधव (३८, रा. पिंगळेवस्ती, पासपोर्ट ऑफीस, गंगा आर्चीड) आणि निलेश शंकर जाधव (३६, रा. रेणुकामाता मंदिर गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

वाघोलीत महिलेची सोनसाखळी हिसकावणारा अल्पवयीन ताब्यात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे दि. ११ ऑगस्टला सकाळी दहा ते साडे दहा वाजण्याच्या सुमारास बालाजीनगर ते एसटी कॉलनी बीआरटी बसस्टॉपपर्यंत पीएमपील बस प्रवास करत होते. त्यावेळी गर्दीचा फायदा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून नेली होती. यागुन्ह्याचा तपास करत असताना पर्वती पोलिस ठाण्यातील पोलिस अमंलदार सद्दाम शेख यांना सोनसाखळी चोरट्यांची माहिती मिळाली. त्यानुसार दोघांना पर्वती पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत अटक केले. पोलिस उपायुक्त संभाजी कदम, पर्वती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण पवार, अमंलदार प्रकाश मरगजे, मनोज बनसोड, महेश मंडलिक, सुर्या जाधव, श्रीकांत शिंदे, अमोल दबडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×