सराईत सुरज ठोंबरेसह दोघांना अटक

सराईत सुरज ठोंबरेसह दोघांना अटक

आरोपींना बेडूक उड्या मारायला लावल्या

marathinews24.com

पुणे – जामिनावर असलेल्या सराईताने पोलीस परवानगी न घेता रॅली काढून आरडा -ओरडा केल्याप्रकरणात सुरज ठोंबरेसह १३ जणांच्या टोळक्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना चक्क बेडूक उड्या मारण्याची शिक्षा पोलिसांनी दिली .हा प्रकार नारायण पेठ येथील मुरलीधर हॉटेल ते भिडे पुल दरम्यान दि. २४ ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला.

दामिनी मार्शलच्या धैर्याने उजळली मुलींची दुनिया – सविस्तर बातमी 

सुरज ठोंबरे, संकेत यादव, ओंकार कुडले, राजन काळभोर, आकाश सासवडे, शुभम पवळे, राहुल कांबळे, निल चव्हाण, शक्ती बनसोडे, दादु तात्याबा पडळकर, नरिसिंग भिमा माने, प्रफुल्ल वाघमारे, ओंकार जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.
डेक्कन नदीपात्रात दि. २४ ऑगस्टला सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास जामिनावर असलेला गुंड सुरज ठोंबरे याच्यासोबत टोळक्याने चारचाकी, दुचाकीवरून रॅली काढून आरडा ओरड केली. शांततेचा भंग करीत त्यांनी कोणत्याही प्रकारची पवानगी घेतली नाही. त्यांनी बेकायदेशिर जमाव जमवून आदेशाचा भंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सराईत सुरत ठोंबरे यांच्या सह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला चक्क बेडूक उड्या मारायला लावल्या. पुन्हा अशा प्रकारचे कुठलेही कृत्य करणार नसल्याचे वदवून घेत त्याला लॉकअपमध्ये डांबले. विश्रामबाग, डेक्कन पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकाने सुरज ठोंबरेसह तिघांना ताब्यात घेत कारवाई केली. तसेच गुन्हे शाखेने त्यांची परिसरातून धिंड काढली. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलिस उपायुक्त निखील पिंगळे, खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, डेक्कन पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे यांच्या पथकाने ही कारवाई केली

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×