लोणीकंद पोलिसांनी आरोपीला केली अटक
marathinews24.com
पुणे – पादचारी तरूणाचा मोबाइल हिसकावणार्या टोळीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना १२ ऑगस्टला रात्री सव्वा दहाच्या सुमारास लोणीकंदमधील नाईकवडे डेअरी समोर घडली होती. याप्रकरणी दीपक रामबगस बंशकार (वय २० रा. सणसवाडी) मयूरेश संतोष बांगरे (वय १८ रा. सणसवाडी ता. शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी २४ वर्षीय तरूणाने फिर्याद दाखल केली होती.
घोरपडीत सहा लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे १२ ऑगस्टला रात्री सव्वा दहाच्या सुमारास लोणीकंदमधील नाईकवडे डेअरी समोरून पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील १० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच, लोणीकंद पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार आरोपींच्या दुचाकीचा क्रमांक मिळवला. त्यानुसार दोघांना अटक करीत त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे तपास करीत आहेत.




















