राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात ३३१ पदक विजेत्यांचा होणार गौरव

मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटरचा शुभारंभ

marathinews24.com

पुणे – राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे शुक्रवारी दि. २९ ऑगस्टला पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ३३१ पदक विजेत्यांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटर योजनेचा शुभारंभही होणार आहे. समारंभाला उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

बाल गणेश कोथरूड फेस्टिव्हलला सुरुवात – सविस्तर बातमी

उत्तराखंड येथे फेब्रुवारीत झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण २०१ पदकांची कमाई करून प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यात ५५ सुवर्ण, ७० रौप्य आणि ७६ कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत राज्यातील ३१४ पदकविजेते खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करणारे ६ खेळाडू यांचा गौरव केला जाणार आहे. सुवर्णपदक विजेत्यांना ७ लाख, रौप्यपदक विजेत्यांना ५ लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना ३ लाख असे रोख पारितोषिक दिले जाणार असून मार्गदर्शकांनाही अनुक्रमे ५० हजार, ३० हजार आणि २० हजार रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. एकूण २८.७० कोटी रुपयांची पारितोषिके वितरित होणार आहेत.

पदक विजेत्यांमध्ये ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे, आशियाई पदक विजेती राही सरनोबत, ऑलिम्पिकपटू देवेंद्र वाल्मिकी, विश्वकरंडक विजेती प्रियंका इंगळे यांचा समावेश असून सर्वाधिक ८ पदके पटकावणाऱ्या आदिती हेगडे हिला तब्बल ३२ लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. कार्यक्रमात मिशन लक्ष्यवेध योजनेचे बोधचिन्ह अनावरण करण्यात येणार असून, राज्य सरकार दरवर्षी १६० कोटी रुपये खर्च करून १२ क्रीडा प्रकारातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणार आहे. पहिल्या टप्प्यात ॲथलेटिक्स, हॉकी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, रोईंग आणि लॉन टेनिस या सहा क्रीडा प्रकारांचा समावेश आहे, अशी माहिती सहसंचालक सुधीर मोरे यांनी दिली. कार्यक्रमाला राज्यातील ३०० खेळाडू, १०० मार्गदर्शक, १०० पदाधिकारी व क्रीडा प्रबोधिनीतील प्रशिक्षणार्थी अशा एकूण ८०० जणांची उपस्थिती राहणार आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×