गुन्हे शाखेच्या युनीट चारची कामगिरी
marathinews24.com
पुणे – प्रेयसीवर गोळीबार करणार्या प्रियरकराला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनीट चारने अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्टल, तीन काडतुसे, दुचाकी असा १ लाख ३३ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. गौरव महेश नायडू (वय २५, रा. श्रीरंग रेसीडन्सी, गायकवाडनगर, पुनावळे, पुणे) असे अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव आहे. तो खडकी बाजारकडे जाणार्या रस्त्यावर गाडी लपवून ठेवण्यासाठी जात असतानाच गुन्हे शाखेच्या त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की – सविस्तर बातमी
प्रेमसंबंध विस्कटल्यामुळे संतापलेल्या प्रियकराने पिस्तुलातून प्रेयसीच्या दिशेने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना २९ ऑगस्टला सकाळी साडेदहाच्या सुमारास बाणेरमधील वीरभद्रनगरात घडली होती. मात्र, हल्लेखोराचा नेम चुकल्याने आणि गोळी न सुटल्यामुळे तरुणी बचावली होती. याप्रकरणी बाणेर पोलिसांसह गुन्हे शाखेकडून आरोपीचा शोध घेण्यात येत होता. मुलीवर गोळीबार करणारा आरोपी खडकी बाजार रस्ता परिसरात जाणार असल्याची माहिती युनीट चारला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून गौरव नायडू याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
तक्रारदार तरुणी बाणेर भागातील खासगी कंपनीत प्रशिक्षण घेत असून, शुक्रवारी (दि. २९) सकाळी दहाच्या सुमारास ती कंपनीत निघाली होती. त्यावेळी आरोपी गौरवने तिला इमारतीच्या आवारात अडविले. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. तिने बोलण्यास नकार दिल्याने आरोपीने त्याच्याकडील पिस्तुलातून तरुणीच्या दिशेने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, पिस्तुलातून गोळीबार झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रियकर हल्ला करण्याच्या तयारीत असताना तरुणी घाबरली होती. दरम्यान, हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त डॉ. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे, सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम, उपनिरीक्षक वैभव मगदूम, हरीष मोरे, किशोर दुशिंग, सुभाष आव्हाड, जहाँगिर पठाण, विठ्ठल वाव्हळ, अजय गायकवाड, प्रवीण भालचिम, तुषार खराडे, विनोद महाजन, अमजद शेख, नागेशिंसग कुंवर, शरद झांजरे, मयुरी नलावडे, रोहिणी पांढरकर यांनी केली.























