देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पिंपरी – बिस्किट कंपनीत काम करणाऱ्या कामगाराने हिशोबात जाणीवपूर्वक चुका करून १५ लाख ५० हजारांची फसवणूक केली. ही घटना ४ जानेवारी ते १४ जून या कालावधीत गर्ग ट्रेडिंग कंपनी देहूगाव येथे घडली.
देहूरोड पोलिसांनी काढली दोन गुन्हेगारांची धिंड – सविस्तर बातमी
मनोज ओमप्रकाश अग्रवाल (वय ४५, देहुगाव) यांनी या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कामगार पिंटू शिवाजी अवघडी (देहुगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अग्रवाल यांची देहूगाव येथे बिस्कीट बनविण्याची गर्ग ट्रेडिंग कंपनी आहे. आरोपी पिंटू हा अग्रवाल यांच्या कंपनीमध्ये काम करतो. त्याच्या हिशोबात 43 हजारांची चूक लक्षात आल्याने अग्रवाल यांनी अधिकची चौकशी केली असता त्याने १५ लाख ५० हजारांची फसवणूक केली.