Breking News
Pimpri Chinchwad LokSamvad : पिंपरी-चिंचवड महोत्सवातील लोकसंवाद उपक्रमMedicine Safety Law : औषध सुरक्षा कायदा, रुग्णालयीन बिलांचे ऑडिट कराNavale Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; कंटनेरच्या धडकेत तरुणाचा मृत्यूShubhangi Garad Suicide Case : शुभांगी गरड आत्महत्याप्रकरणाची सखोल चौकशी करा : डॉ. नीलम गोऱ्हेMorya Gosavi Palkhi : ‘दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागतSeva Sankalp Abhiyan Pune : ‘सेवा संकल्प अभियान’ लोकाभिमुख पद्धतीने राबवून पात्र नागरिकांना योजनांचा थेट लाभ द्या-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीE-Pik Pahani : शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी पूर्ण करावी : तहसीलदार स्वप्निल रावडेPune Crime News : पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात प्रवाशाला लुटलेTractor Accident : ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून मुलीचा मृत्यूGaneshotsav 2026 : ‘बाप्पा डॉट ऑर्ग’वर गणेशोत्सवातील पाच वैशिष्ट्यपूर्ण कथांची निवड, त्यात पुण्यातला एक

किरकोळ वादातून मित्रावरच केला प्राणघातक हल्ला

Lohgaon Rickshaw Driver Attack : सीएनजी पंपावर वादातून रिक्षा चालकावर शस्त्राने वार

प्रशिक शिंनगारेवर सपासप वार;आरोपी अद्याप मोकाट

marathinews24.com

बीड – किरकोळ वादाचा राग मनात धरून मित्रानेच मित्रावर प्राणघातक चाकूने हल्ला केल्याची घटना माजलगाव तालुक्यातील एकदरा येथे काही दिवसांपूर्वी घडली आहे . या घटनेत प्रशिक भाऊसाहेब शिनगारे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, या प्रकरणातील आरोपी अद्याप ही मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण झाला आहे.

पैशांच्या वादातून पोटात खुपसला चाकू – सविस्तर बातमी

प्रशिक शिनगारे आणि आरोपी सोहेल बाबू पठाण हे एकाच गावातील रहिवासी असून पूर्वी दोघांमध्ये मैत्री होती. ते दोघेही एका पेट्रोल पंपावर एकत्र काम करत होते. वर्षभरापूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात ठेवून आरोपीने प्रशिकविरोधात खुन्नस काढत असल्याचे समोर आले आहे. या घटनेच्या दिवशी आरोपीने जातीवाचक शिवीगाळ करत धारदार शस्त्र काढून प्रशिक शिनगारे यांच्या पाठीवर, छातीवर,पोटावर वार केले आहेत.

हल्ल्यात प्रशिक गंभीर जखमी झाल्याने. त्याला तातडीने उपचारांसाठी बीड येथील शासकीय रुग्णालयात दाखल
करण्यात आले होते. उपचारानंतर दि. ३१ डिसेंबरला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यानंतर प्रशिक शिनगारे यांनी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी सोहेल बाबू पठाण, बाबू हुसेन पठाण आणि निवृत्ती रामकिसन कळसे (सर्व रा. एकदरा) यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट तसेच सुधारित बी.एन.एस. कायदा २०२३ अंतर्गत गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, माजलगाव तालुक्यात अलीकडील काळात वाढत असलेल्या मारहाण, हल्ले व जातीय तणावाच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकरणांत कारवाई न झाल्यास समाजात चुकीचा संदेश जातो. त्यामुळे कोणताही दबाव न घेता आरोपींना तात्काळ अटक करून कायद्याचा धाक निर्माण करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×