मोटार चालकावर कोयत्याने वार करणारा गजाआड

आंबेगाव पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – दुचाकीने मोटारीला धडक दिल्यानंतर जाब विचारणाऱ्या मोटार चालक तरुणावर कोयत्याने वार करुन पसार झालेल्या एकाला आंंबेगाव पोलिसांनी अटक केली. त्याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर घडली होती. मृणाल दीपक जाधव (वय २०, रा. कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पुण्यातील संगणक अभियंत्याला भोंदू महिलेने गंडवले – सविस्तर बातमी

जाधव याच्याबरोबर असलेल्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. २ नोव्हेंबर रोजी तक्रारदार मोटार चालक तरुण, त्याचा भाऊ आणि मित्र हे मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग परिसरातील काॅफी शाॅपमध्ये गेले होते. त्यावेळी आरोपी जाधव आणि त्याच्याबरोबर असलेले दोन अल्पवयीन साथीदार दुचाकीवरुन तेथे आले. दुचाकीने मोटारीला धडक दिल्याने मोटार चालक तरुणाने त्यांना जाब विचारला. त्यानंतर जाधव आणि अल्पवयीन साथीदारांनी मोाटार चालक तरुणाव कोयत्याने वार केले.

तरुणाचा भाऊ आणि मित्रांना मारहाण करुन ते पसार झाले. पोलिसांनी तपास करुन जाधव आणि अल्पवयीन साथीदाीरांना ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन चोरमले, सहायक निरीक्षक फिराेज मुलाणी, पोलीस कर्मचारी विशाल मगदूम, भिवा वाघमारे, राहुल मोहिते यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×