वराह पालनाच्या वादातून पिस्तूल बाळगणारा गजाआड

वराह पालनाच्या वादातून पिस्तूल बाळगणारा गजाआड

पोलिसांकडून पिस्तूल जप्त

marathinews24.com

पुणे – शहरातील येरवड्यातील पोते वस्ती भागात राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये वराह पालनावरुन वाद सुरू होते. मारहाणीच्या भीतीमुळे पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला लक्ष्मीनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. सोनूसिंग दीपकसिंग बावरी (वय २२, रा. पोते वस्ती, मांगीरबाबा मंदिराशेजारी, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. येरवड्यातील पोते वस्तीत सोनूसिंग बावरी आणि कुटुंबीय राहायला आहेत. या भागात अनेक जण वराह पालन करतात. त्या व्यवसायातून बावरी कुटुंबीयांचा एका कुटुंबांशी वाद झाला होता.

लोन ॲपच्या माध्यमातून तरुणाला धमकावून पैसे उकळले – सविस्तर बातमी 

वादातून दोन कुटुंबात हाणामारी झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या होत्या. सोनूसिंग बावरी याच्याविरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल झाले हाेते. त्याने काही दिवसांपूर्वी समाज माध्यमात एक चित्रफीत प्रसारित केली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. सोनूसिग हा येरवड्यातील डेक्कन काॅलेज परिसरात थांबला असून, त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी अमोल गायकवाड आणि कादिर शेख यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.

त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले. पोलीस उपायुक्त चुलुमुला रजनीकात, सहायक आयुक्त सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्ष्मीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र कदम, सहायक निरीक्षक रवीकांत नंदनवार, अमोल गायकवाड, कादिर शेख, अक्षय शिंदे, राहुल परदेशी, अतुल जाधव, सूरज ओंबासे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×