Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

लोन ॲपच्या माध्यमातून तरुणाला धमकावून पैसे उकळले

पुण्यातील व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचे दोघे मोटारीची काच फोडून ऐवजाची चोरीफरार

मुंढवा पोलिसांकडून गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – लोन ॲपच्या माध्यमातून तरुणाची बदनामी करण्याची धमकी देऊन चोरट्यांनी त्याच्याकडून पैसे उकळल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत २९ वर्षीय तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात रिक्षांची चोरी; व्यवसायही थाटला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर जानेवारी महिन्यात चोरट्यांनी संपर्क साधला. तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या चोरट्यांनी आंतरराष्ट्रीय मोबाइल क्रमांकाचा वापर केला होता. आराेपींनी त्याला लोन ॲपवरुन काढलेल्या कर्जाचे पैसे भरण्यास सांगितले. त्यानंतर तरुणाने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. चोरट्यांनी तरुणाच्या छायाचित्रात तांत्रिक फेरफार करुन समाज माध्यमात प्रसारित करण्याची धमकी दिली होती. हे छायाचित्र परिचितांना पाठविण्यात येईल, असे सांगून त्याच्याकडून पैसे उकळले, असे तरुणाने फिर्यादीत म्हटले आहे. चोरट्यांच्या धमकीमुळे घाबरलेल्या तरुणाने मुंडवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन नुकतीच तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करत आहेत.

लोन ॲपच्या धमकीमुळे आत्महत्या

ऑनलाइन पद्धतीने लोन देणाऱ्या काही ॲपच्या माध्यमातून वर्षभरापूर्वी शहर परिसरात फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या. लोन ॲपच्या माध्यमातून धमकावून अनेकांकडून चोरट्यांनी पैसे घेतले होते. छायाचित्र प्रसारित करण्याची धमकी देण्यात आली होती. अनेकांनी निमूटपणे पैसे भरले होते. धमकीमुळे सहकारनगर, पिंपरी-चिंचवड परिसरातील दोन तरुणांनी आत्महत्या करण्याची घटना घडली होती. एका युवतीने धमकीमुळे आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×