Breking News
नवले पुलाजवळ वेश्याव्यवसाय तेजीत, आरोपी महिलांविरुद्ध गुन्हाखिशात नाही दमडी, पण गॉगल मिळवण्यासाठी बनला बांधकाम व्यावसायिकभाईगिरी करणाऱ्या सराईताला केले स्थानबद्धठेकेदाराकडून लाच घेणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला पकडलेवाहन चोराकडुन दोन दुचाकी जप्त, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरीपुण्यातील चोर राजासह तिघांना अटक, घरफोडीचे ८ गुन्हे उघडकीसजबरी चोर्‍या करणार्‍या दोघांना बेड्या, शिवाजीनगर पोलिसांची कामगिरीचोरीच्या मोबाईलद्वारे १० लाख रुपयांची खंडणी मागणार्‍याला बेड्यापुणे : आंबा महोत्सवाला ग्राहकांचा मोठा प्रतिसादग्रंथालयांच्या अडचणी सोडण्यासाठी शासन प्रयत्नशील- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थी वसतिगृहात राहून घरफोडी करणारा परप्रांतीय गजाआड

विद्यार्थी वसतिगृहात राहणाऱ्या परप्रांतीयाकडून घरफोडी; पोलिसांनी केला अटक, घरफोडीचे तीन गुन्हे उघड

Marathinews24.com

पुणे – विद्यार्थी वसतिगाृहात राहून घरफोडी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला आंबेगाव पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून २ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्याने आंबेगाव, बावधन, लोणीकंद परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. व्यंकटेश रमेश (वय २२ व रा. पी.जी. बिल्डिंग, कोथरूड, मूळ रा. बंगळुरू, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गेल्या महिन्यात १७ मार्चला कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक परिसरात भरदिवसा फ्लॅटचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली होती. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

पैशाची अडवणूक केल्यामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण पोलिसांनी तपासले. चित्रीकरणावरुन तपास करुन पोलिसांनी रमेश याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आंबेगाव, लोणीकंद आणि बनावधन भागात घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपी व्यंकटेश रमेश मूळचा बंगळुरूतील आहे. तो कोथरूड भागातील एका खासगी वसतिगृहात (पीजी) राहत होता. वसतिगृहात राहून तो घरफोडीचे गुन्हे करत होता. त्याने आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असून, त्यादृष्टीने तपास करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिली. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, उपनिरीक्षक माेहन कळमकर, पोलीस कर्मचारी शैलेंद्र साठे, हनुमंत मासाळ, चेतन गोरे, निलेश जमदाडे, धनाजी धोत्रे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे यांनी ही कामगिरी केली.

घरफोडी प्रकरणात चोरटा गजाआड

भरदिवसा घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या चोरट्याला गु्न्हे शाखेच्या युनिट पाचने अटक केली. त्याच्याकडून १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. मॉण्टी ऊर्फ आर्यन माने (वय २२ , रा. वंदे मातरम चौक, रामटेकडी, हडपसर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. हडपसर परिसरात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणाचा समांतर गुन्हे शाखेकडून केला जात होता माने याने।घरफोडी केल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमित कांबळे यांना मिळाली. पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करुन त्याला अटक केली.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top