Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

पेट्रोल पंपावर दहशत माजविणारे गजाआड

पोलिसाच्या पथकाने सापळा लावून तिघांना पकडले

marathinews24.com

पुणे – शहरातील येरवडा भागातील एका पेट्रोल पंपावर दहशत माजवून कामगारावर शस्त्राने वार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली.

तरूणाचे अपहरण करीत बेदम मारहाण, पिस्तूलानेही धमकावले – सविस्तर बातमी

कृष्णा प्रभाकर नाईक (वय २५), अक्षय उर्फ आबा सुदाम जमदाडे (वय २५), अली रफीक शेख (वय २५, तिघे रा. गांधीनगर, येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. १३ नाेव्हेंबर रोजी येरवड्यातील गुंजन चित्रपटगृहाजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरण्यावरुन आरोपी नाईक, जमदाडे, शेख यांनी पंपावरील कामगारांशी वाद घातला. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन आरोपींनी दहशत माजविली होती. पोलिसांकडे तक्रार दिल्यास पंपावरील कामगारांना जीवे मारण्याची धमकी आरोपींनी दिली होती. याबाबत एका कामगाराने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. आरोपी कल्याणीनगर येथील नदीपात्रात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून तिघांना पकडले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय ठाकर, उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे, पोलीस कर्मचारी शिंदे, कोकणे, वाबळे, सोगे, कांबळे, सुतार यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×