Breking News
पुण्यात डिलिव्हरी बॉयला पिस्तूल लावून लुटलेजिल्हा परिषदेच्या ‘पुणे मॉडेल स्कूल’ उपक्रमाचा १४ जून रोजी शुभारंभप्रधानमंत्री धरती आबा जनभागीदारी अभियानामध्ये सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहनपोलीस आयुक्त कडाडले, बेशिस्तांना कायमस्वरूपी धडा शिकवणारपिंपरी चिंचवड परिवहन कार्यक्षेत्रातील 123 ऑटोरिक्षा स्टॅंण्डना मान्यतापुणे : टेम्पोच्या धडकेत पादचारी तरूण ठारएसटी प्रवासात महिलेचे ४ लाखांचे दागिने चोरीलातब्बल २ हजार ६५ लीटर गावठी दारू जप्तभांडण लावल्याची शंका, टोळक्याकडून तरूणावर वारस्वच्छतागृह साफसफाईला दिला नकार, अल्पवयीनाला जीवे मारण्याचा प्रयत्न

पावसामध्ये चमकलेल्या विजेच्या प्रकाशावरुन खुनाची उकल

स्पोर्टस बाईकवरून सोनसाखळी हिसकावणार्‍या सराईताला बेड्या ८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस, रांजणगावसह एलसीबी पथकाची कामगिरी पुणे- पाण्याची बाटली विकत घेण्याच्या बहाण्याने महिलांच्या गळयातील मंगळसुत्र हिसकावून नेणार्‍या अट्टल चोरट्याला पुणे ग्रामीण पोलिसांच्या रांजणगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून ८ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून, तब्बल १० लाख १० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. मारुती ऊर्फ गोविंद रामनाथ आंधळे (वय ३८ रा लिंबोडी पोस्ट देवीनिमगाव ता आष्टी जि बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार शरद बापु पवार (रा लोणी सय्यदमीर ता आष्टी) पसार आहे. याप्रकरणी वंदना रोहिदास शेटे (वय ३३ रा. पिंपरी दुमाला ता शिरुर पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वंदना शेटे २५ मार्चला रांजणगाव गणपती चौकातील धनगरवाडा स्नॅक्स सेंटरमध्ये होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोघाजणांनी पाण्याची बाटली खरेदीच्या बहाण्याने वंदनाला ५० रूपये दिले. त्यानंतर उर्वरित पैसे देत असताना आरोपींनी महिलेच्या गळ्यातील ११ गॅम वजनाचे सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेले. याप्रकरणी रांजणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्हयांचा तपास स्थानिक गुन्हे शाखा तसेच रांजणगाव पोलीस करीत होते. घटनास्थळांवरील सी सी टि व्हि फुटेज तपासुन चोरटयांनी गुन्हा करताना स्पोर्टबाईक वापरली होती. दरम्यानच्या काळात शिरुर, शिक्रापुर, चाकण, आळंदीसह अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच पद्धतीने गुन्हे झाले होते. परिसरातील मार्गावर १० दिवसांपासुन स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलीसांनी संयुक्तरीत्या सापळे रचले. परंतु आरोपी हे वारंवार चकवा देत होते. घटनास्थळापासुन ते बीड जिल्हयापर्यत सुमारे ३०० ते ३५० कॅमेरे तपासले. संबंधित गुन्हा मारुती ऊर्फ गोविंद आंधळे आणि शरद बापु पवार यांनी केल्याचे स्पष्ट झाले. आरोपी आंधळे हा अहिल्यानगर ते शिरूरला स्पोर्टस बाईकवरुन येणार असल्याची माहिती अमंलदार उमेश कुतवळ यांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी शिरुर हददीत सतरा कमान पुलाच्या अलीकडे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, एपीआय दत्ताजीराव मोहिते, एपीआय कुलदिप संकपाळ, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजु जाधव, योगेश नागरगोजे, सागर धुमाळ, थोरात, दत्ता शिंदे, उमेश कुतवळ, योगेश गुंड, संतोष सांळुखे, खरबस, साळवे यांनी केली. *८ गुन्हे उघडकीस, १० तोळे सोने जप्त* स्पोर्टस बाईकवरून प्रवास करीत आरोपींनी शिरुर, शिक्रापुर व पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील चाकण, आळंदी देवाची, अहिल्यानगर जिल्हयातील कर्जत परिसरात गुन्हा केल्याचे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून गुन्हयात वापरलेली दुचाकी, ८ गुन्हयातील १० तोळे २०० मिली गॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा १० लाख १० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – पावसामध्ये चमकलेल्या वीजेच्या प्रकाशातून भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेच्या खुनाची उकल केली आहे. याप्रकरणी तब्बल ३२० सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीला उत्तर प्रदेशातून ताब्यात घेत बेड्या ठोकल्या आहेत. चोरीच्या उद्देशाने त्याने महिलेकडील ऐवज लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने आरडाओरड केल्यामुळे आरोपीने महिलेच्या डोक्यात दगड मारून खून केल्याचे उघडसकी आहे.

लोणावळा परिसरात वाहतूक बदलाबाबतचे तात्पुरते आदेश जारी – सविस्तर बातमी 

शाहरुख शकील मन्सुर ( वय २७ रा. मुळ गाव अमखेरा, शहाजपुर, दमपुर, बिजनोर, उत्तरप्रदेश सध्या रा. हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहायक आयुक्त राहूल आवारे, पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे उपस्थित होते.

आंबेगाव बुद्रूक परिसरात २० मे रोजी एका महिलेच्या डोक्यात मारहाण करून तिचा खून केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निलेश मोकाशी खून झालेल्या महिलेची ओळख पटविली. तिचे नाव प्रीती वाखारे वय ३५ असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पथकाने तिच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण केले.

त्यानुसार कोल्हेवाडी ते नवले पुलापर्यंचे १०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता, महिला दुचाकी गाडीवर बसुन नवले पुलावर गेल्याचे दिसून आले. दरम्यान, २० मे रोजी मु सळधार पावसामुळे रस्त्यावरील लाईट अपुरी असल्यामुळे तपासात अडथळा निर्माण झाला होता. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची बारकाईने पाहणी केली असता, वीज चमकल्यामुळे झालेल्या प्रकाशात महिला रिक्षामध्ये बसताना दिसुन आली.

तपास पथकाने रिक्षाच्या काळ्या रंगाच्या हुडवरून आरटीओकडून क्रमांक मिळविला. पुणे शहरामध्ये रजिस्टर असलेल्या १० हजार ७९४ रिक्षांची माहीती प्राप्त केली. तब्बल १ हजार २०० रिक्षांची वाहतुक विभागाकडुन झालेल्या दंडात्मक कारवाईचे चलनावरुन रिक्षाचे दोन्ही बाजूचे फोटो प्राप्त केले. १५० सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे रिक्षाचा शोध घेतला. आरोपी शाहरुख मन्सुर याने खून केल्याचे उघडकीस आले.

पथकाने पुणे ते अमखेरा, शहाजपुर, धामपुर, बिजनोर, उत्तरप्रदेश असे ३ हजार २०० किलोमीटर अंतर कापून आरोपी शाहरुख शकील मन्सुर याला ९ जूनला अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, एसीपी राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश मोकाशी, राहुल शेडगे, नागेश पिसाळ, नरेंद्र महांगरे, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, अभिनय चौधरी, तुकाराम सुतार, संदीप आगळे, सागर बोरगे, मितेश चोरमोले, किरण साबळे, निलेश खैरमोडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top