Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

येरवडा परिसरातील घटना 

marathinews24.com

पुणे – पीएमपी बसच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील सहप्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना येरवडा परिसरात घडली. या प्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांकडून पीएमपी बस चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. विकी महातो (वय २२ ,रा. धानोरी, विश्रांतवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुभाष दादू कांबळे (वय ५१, रा. गुरुकृपा काॅम्प्लेक्स, शितळादेवी चौक, गुरुवार पेठ) यांनी लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन; २३ जणांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सुभाष कांबळे आणि विकी महातो हे १४ फेब्रुवारी रोजी दुपारी चारच्या सुमारास येरवडा परिसरातून निघाले होते. मेट्रो मार्गिकेच्या परिससरात अचानक एक रिक्षा चालक समोर आला. त्या वेळी दुचाकीस्वार कांबळे आणि सहप्रवासी महातो हे घसरुन रस्त्यात पडले. पाठीमागून येणाऱ्या पीएमपी बसच्या चाकाखाली सापडून महातो गंभीर जखमी झाले. गंभीर जखमी झाालेल्या महातो याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×