पुण्यात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन

पुण्यात पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन

२३ जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – पोलीस परवानगी न घेता जंगली महाराज स्त्यावर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या संघटनेच्या २३ कार्यकर्त्यांविरुद्ध डेक्कन पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. जंगली महाराजा रस्त्यावरील श्री छत्रपती संभाजी उद्यान परिसरात रविवारी सकाळी संघटनेकडून पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन करण्यासाठी संबंधित संघटनेकडून पोलिसांकडे परवानगी मागितली होती.

सावधान…बांग्लादेशींची कीड फोफावयेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर संंघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पोलीस परवानगी न घेता आंदोलन केल्या प्रकरणी पोलिसांनी २३ कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना डेक्कन पोलीस टाण्यात आणले. पोलिसांनी त्यांनी नोटीस बजावून सोडून दिले. याबाबत पोलीस हवालदार नलिन येरुणकर यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त श्री छत्रपती संभाजी उद्यानात पुष्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शन पाहण्यासाटी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे संंबंधित संस्थेकडून आयाेजित करण्यात आलेल्या आंदोलनास परवानगी नाकारण्यात आली, अशी माहिती डेक्कन पोलिसांना दिली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लवकरच इस्त्राईलला भेट देणार आहेत. पॅलेस्टिनी नागरिकांच्या मागण्यांकडे होणारे दुर्लक्ष, विरोधी भूमिकेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र, पोलिसांनी शांततामय मार्गाने करण्यात येणाऱ्या आंदोलनास परवानगी नाकारून कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×