सावधान…बांग्लादेशींची कीड फोफावयेत

सावधान...बांग्लादेशींची कीड फोफावयेत

घुसखोरी रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी बांग्लादेशींविरूद्ध मोहिम

marathinews24.com

पुणे – शहरासह बांग्लादेशींची संख्या वाढत असून, छुप्या पद्धतीने वास्तव्य करीत ते छोट्या-मोठ्या कामातून पैसे कमवत आहेत. त्यातच मुली-महिलांना काम मिळवून देण्याच्या बहाण्याने टोळी सक्रिय असल्याने त्यांच्याकडून महिलांना बांग्लादेशातून बोलावून पुण्यातील कुंटणखान्यात विक्री केली जात आहे. त्यामुळे बांग्लादेशींची कीड फोफावत चालली असल्याचे चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, केंद्र व राज्य सरकारच्या कठोर आदेशानंतर आता पुणे पोलिसांनी बांग्लादेशींविरूद्ध मोहिम हाती घेतली आहे. प्रामुख्याने मध्यवर्ती बुधवार पेठेत राहणार्‍या बहुतांश रेट लाईट भागात झाडाझडती घेत नुकतेच दोन बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे बांग्लादेशींचे पुण्यातील वास्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

पुण्यात गांजा तस्करीसाठी कारचा वापर, दोघांना अटक – सविस्तर बातमी 

पुण्यातील बुधवार पेठ वेश्याव्यवसाय करणार्‍या दोन बांग्लादेशी महिलांचा पोलिसांनी नुकताच पर्दापाश केला आहे. याप्रकरणी संबंधितांना ताब्यात घेउन चौकशीला गती दिली आहे. यापुर्वी जुलै २०२५ मध्ये फरासखाना पोलिसांनी बुधवार पेठेतून ८ महिलांना अटक केले होते. त्यानंतर त्यांना बांग्लादेशात देशात पाठविण्याची प्रक्रिया पार पाडली होती. विनापरवाना राहणार्‍या बांग्लादेशी नागरिकांची सर्चमोहिम राबवून झालेल्या कारवाईत महिलांचे बिंग फुटले होते. संबंधित बांग्लादेशी महिला छुप्या पद्धतीने देशाची सीमा पार करुन अवैधरित्या हिंदुस्थानात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपण पश्चिम बंगालमधील रहिवाशी असल्याचे सांगुन, पुण्यातील रेडलाईट एरियामध्य वेश्या व्यवसायाचा मार्ग पत्करला होता. काम मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेक एजंटांकडून बांग्लादेशी महिलांना पुण्यात आणले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महिला-मुलींना थेट कुंटणखान्यात पाठवून वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे यापुर्वीच्या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे. कुटूंबाची जबाबदारी, झालेली फसवणूक, उपजिवीका भागविताना बांग्लादेशी महिला पुन्हा बाहेर पडण्यास तयार होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यातच बांगलादेशींना मतदान कार्डपासून, रहिवाशी पुरावा, राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देत अभय देणार्‍यांचीही साखळी आहे. दरम्यान, बुधवार पेठेतील कुंटणखाना मालकीणीची नजर चुकवून एका बांग्लादेशी महिलेने फरासखाना पोलीस ठाणे गाठले होते. मला यातून वाचवा, मी बांग्लादेशी असल्याचे सांगितले होते. त्यावेळी ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला हवालदाराने तिला मदतीच्या बहाण्याने थेट कुंटणखाना मालकीणीशी तोडपाणी केले. तक्रारीसाठी आलेल्या बांग्लादेशी महिलेला पुन्हा एकदा तिच्या हवाली केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. त्यामुळे बांग्लादेशींचे वास्तव्य वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

बांग्लादेशी महिलांचे वास्तव्य तपास यंत्रणेच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहे. शिक्षण, नोकरी, व्यवसाय करण्यासाठी पुण्यासह उपनगरांमध्ये आणि जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात परप्रांतीय नागरिकांना ओढा वाढला आहे. त्याचाच फायदा घेउन बांगलादेशी नागरिकही छुप्या पद्धतीने हिंदुस्थानमध्ये प्रवेश करून पुण्याकडे धाव घेत आहेत. कमी पैशांतही ते बांधकाम व्यवसायाच्या ठिकाणी मजुरी करतात. खासगी कंपनीत कामासह मिळेल त्या रोजंदारीवर पैसे मिळवित घुसखोर उपजिवीका भागवित आहेत. मात्र, कोणतीही परवाना न घेता, विना पासपोर्ट, व्हिसा हिंदुस्थानात प्रवेश करीत बांग्लादेशींनी तपास यंत्रणांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. त्यांच्याविरूद्धही कठोर कारवाई होण्याची आवश्यकता आहे.

गद्दार धावतायेत मदतीला

रोजंदारीच्या आडून स्थानिक भागातील रेशनकार्ड, मतदानकार्ड मिळवून काही बांग्लादेशी आता हिंदुस्थानी नागरिक म्हणून मिरवत आहेत. त्यांचाही ठावठिकाणा शोधणे अत्यावश्यक आहे. पुण्यासह उपनगरातील काही एजंटाकडूनही पैशांसाठी बांग्लादेशीना थेट कागदपत्रांची उपलब्धता करून दिल्याचे उघडकीस आले होते. ते बांग्लादेशी लोक १० वर्षांपासून जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरात राहत असल्याचे मागील दीड वर्षांपुर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्पष्ट झाले. बेकायदेशिररित्या वास्तव्य करणार्‍या २१ बांग्लादेशी नागरिकांनाही बेड्या ठोकल्या होत्या. ते ६ महिने ते १० वर्षांपासून रांजणगावातील कारेगाव परिसरात राहायला होते. इमारत बांधकामासाठी ते बिगारी काम करीत होते. त्यांच्याकडे आधारकार्ड, मतदानकार्ड आढळून आल्याची धक्कादायक माहिती तपासात उघडकीस आली होती.

बनावट कागदपत्राद्वारेही ओलांडली जातेय देशाची सीमा

देशाची ओलांडुन वैध्य पारपत्र परवाना धारण न करता बांगलादेशींकडून प्रवेश मिळविला जातो. बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड व मतदानकार्ड मिळवण्यासाठी ते स्थानिकांचा आधार घेतात. एजंटाकडून त्यांचे बनावट आधारकार्ड,पॅनकार्ड, मतदानकार्ड तयार केले जाते. स्थानिक नागरिकांसह एजंटांनी काही रक्कमेच्या लालसेने बांग्लादेशीची घुसखोरी वाढली आहे. घुसखोर बांग्लादेशी नागरिक उदरनिर्वाह करत असून, त्यांची कोणतीही माहिती न घेता संबंधितांना कामावर ठेवले जात असल्याचे दिसून आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×