Breking News
फ्रेंचायजी देण्याच्या बहाण्याने १२ लाख ४० हजारांची फसवणूककंपनीतील कामगाराने केली १५ लाख ५० हजारांची फसवणूकआपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला कुंडमळा येथे बचाव कार्याचा आढावादेहूरोड पोलिसांनी काढली दोन गुन्हेगारांची धिंडशॉर्ट सर्किटमुळे आग विजेचे बारा मीटर जळून खाकमहिलांच्या सुरक्षितता, सशक्तीकरण, उन्नतीसाठी राज्यशासन वचनबद्ध- उपमुख्यमंत्री अजित पवारकुंडमळा येथील घटना अतिशय दुर्देवी – खासदार श्रीरंग बारणेकुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळला; तीन पर्यटकांचा मृत्यूपुण्यात आजपर्यंतच्या एन्काऊंटरमध्ये ३३ गुंडांचा खात्मासोने खरेदीच्या बहाण्याने हातचलाखी करणारी टोळी सक्रिय

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू

ट्रक चालकाने रस्त्यावरच वळण घेतले, मोटार चालकाचा मृत्यू

विमानतळ पोलीस ठाण्यात ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील खराडी भागात घडली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल केला आहे. सिद्धार्थ हुल्लाजी घावटे (वय १९, रा. साडेसतरानळी, हडपसर) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचा मित्र सूरज राठोड (वय २७, रा. आव्हाळवाडी, वाघोली, नगर रस्ता) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सूरज आणि त्याचा सहप्रवासी मित्र सिद्धार्थ हे नगर रस्त्यावरील खराडी भागातून गुरुवारी (२२ मे) रात्री साडेदहाच्या सुमारास निघाले होते. त्या वेळी खराडी बायपास चौकात दुचाकीला पाठीमागून ट्रॅक्टरने धडक दिली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी सिद्धार्थ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले तपास करत आहेत.

आठवडाभरात शहरात वेगवेगळ्या भागात झालेल्या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. कोंढवा भागात भरधाव मोटारीच्या धडकेत निवृत्ती बाजीराव किसवे (वय १३, रा. कोंढवा) याचा गेल्या रविवारी (१८ मे) सायंकाळी मृत्यू झाला होता. शनिवारी (१७ मे) दुपारी डंपरच्या चाकाखाली सापडून दुचाकीवरील सहप्रवासी शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. अपघातात अंशुमन अनुपमकुमार गायकवाड (वय ११, रा. केशवननगर, मुंढवा) याचा मृत्यू झाला. त्यानंतर सोमवारी (१९ मे) रात्री कोथरूडमध्ये भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात सहप्रवासी अबीर पानसे या बारा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला होता. नगर रस्ता, येरवडा भागात दोन दिवसांपूर्वी वेगवेगळ्या अपघातात पादचारी दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला होता.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top