वारजे परिसरात दुचाकीस्वार तरूणाला लुटले

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले

वारजेकडे जाणार्‍या रस्त्यावर घडली घटना

marathinews24.com

पुणे – दुचाकीवरून घरी चाललेल्या तरूणाला अडवून दोघा चोरट्यांनी २१ हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना २ नोव्हेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास वारजेकडे जाणार्‍या रस्त्यावर घडली आहे. याप्रकरणी कोंढवा बुदूक परिसरात राहणार्‍या ३६ वर्षीय नागरिकाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

कोथरूडमध्ये टोळक्याचा राडा, पुर्ववैमनस्यातून तरूणावर वार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कोंढवा बुद्रूक परिसरात राहायला असून, २ नोव्हेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास दुचाकीवर प्रवास करीत वारजे रस्त्याने निघाले होते. त्यावेळी दोघा दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना अडवून झटापट केली. त्यांच्या खिशातील २१ हजारांची रोकड चोरून नेली. तरूणाने आरडाओरड करेपर्यंत चोरटे पसार झाले. पोलीस अमलदार कदम तपास करीत आहेत.

वानवडीत महिलेची सोनसाखळी हिसकावली; दुचाकीस्वार चोरट्यांचा हैदोस सुरूच

पुणे – शहरातील विविध भागात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुडगूस थांबला नसून, दिवाळीनंतर चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याचे दागिने हिसकावण्याच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळच्या सुमारास शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडणार्‍या महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रस्त्याने पायी चाललेल्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी तिच्या गळ्यातील दीड लाख रूपयांची सोनसाखळी हिसकावून नेली आहे. ही घटना ३ नोव्हेंबरला सकाळी सव्वा सातच्या सुमारास वानवडीतील राधेश्याम सोसायटीसमोर घडली आहे. याप्रकरणी केदारीनगरात राहणार्‍या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार दोघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला ३ नोव्हेंबरला रस्त्याने पायी जात असताना, दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी त्यांचा पाठलाग केला. राधेशाम सोसायटीसमोर चोरट्यांनी महिलेला अडवून त्यांच्या गळ्यातील १ लाख ५० हजारांचे सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×