६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – पुर्ववैमनस्यातून टोळक्याने तरूणाला बेदम मारहाण करीत त्याच्यावर शस्त्राने वार केल्याची घटना २ नोव्हेंबरला संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास कोथरूडमधील बसस्टॅडमागे घडली आहे. याप्रकरणी उत्तमनगरमध्ये राहणार्या २१ वर्षीय तरूणाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार ६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऑनलाईनरित्या वाहनाचा व्यवहार फसला – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण उत्तमनगरमध्ये राहायला असून, काही दिवसांपुर्वी एकासोबत त्याचे भांडण झाले होते. त्याच रागातून संबंधिताने साथीदारांच्या मदतीने २ नोव्हेंबरला तक्रारदार तरूणाला कोथरूडमध्ये गाठले. त्याला बेदम मारहाण करीत शस्त्राने वार करून डोक्यात काचेची बाटली फोडून गंभीररित्या जखमी केले आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार मोहन दळवी तपास करीत आहेत.





















