जेष्ठाला पावणेदोन लाखांचा गंडा
marathinews24.com
पुणे – ऑनलाईनरित्या वाहनाची विक्री करण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्याने ७४ वर्षीय जेष्ठाला १ लाख ७४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ११ ते १३ जुलै कालावधीत बिबवेवाडीत घडली आहे. याप्रकरणी जेष्ठ नागरिकाने मार्वेâटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक असून, ते बिबवेवाडीत राहायला आहेत. त्यांच्याकडील जुनी मोटार विक्री करायची असल्यामुळे त्यांनी ऑनलाईनरित्या गुगलवर सर्च केले होते. त्यानंतर ११ जुलैला एकाने संबंधित जेष्ठ नागरिकाला फोन करून तुमच्या मोटारीचा ऑनलाईनरित्या व्यवहार करून देतो, अशी बतावणी केली. त्यासाठी काही रक्कम लागेल, असे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरूवात केली. जवळपास पावणेदोन लाख रूपये वर्ग करूनही त्यांच्या गाडीचा व्यवहार झाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनीता नवले तपास करीत आहेत.




















