पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली

पादचारी महिलेची सोनसाखळी हिसकावली

वानवडीतील घटना

marathinews24.com

पुणे – पादचारी महिलेकडील दीड लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना वानवडीतील केदारीनगर भागात घडली. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला वानवडीतील केदारीनगर भागात राहायला आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (३ नोव्हेंबर) सकाळी सातच्या सुमारास मुलाला शाळेत सोडविण्यासाठी महिला घरातून बाहेर पडली. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये त्याला सोडून महिला केदारीनगर भागातून निघाली होती. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यत येत असून, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक तपास करत आहेत.

पीएमपी प्रवासी महिलेचे दागिने चोरी

पीएमपी प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ चोरट्यांनी लांबविल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. याबाबत एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ३९ वर्षीय महिला वाघोली परिसरात राहायला आहेत. त्या १ नोव्हेंबर रोजी सकाळी पावणेनऊच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाटा थांब्यावर थांबल्या होत्या. पीएमपी बसमध्ये प्रवेश करताना चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ८३ हजारांची सोन्याची माळ लांबविली. पोलीस उपनिरीक्षक हवाले तपास करत आहेत. शहरात गेल्या काही महिन्यांपासून पीएमपी प्रवासी महिलांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×