स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – दुचाकीस्वार चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोघांचे मोबाइल हिसकावून नेल्याची घटना पुणे रेल्वे स्थानक आणि स्वारगेट स्थानक परिसरात घडली. याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोटारीला धडक दिल्याने जाब विचारणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार – सविस्तर बातमी
तक्रारदार तरुण एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. धनकवडी भागातील एका खासगी वसतिगृहात तो राहायला आहे. सोमवारी (३ नोव्हेंबर) पहाटे साडेचारच्या सुमारास तो स्वारगेट एसटी स्थानक परिसरात थांबला होता. त्यावेळी गर्दीत चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल संच हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.
पुणे रेल्वे स्थानक परिसरात एका तरुणाकडील मोबाइल संच हिसकावून नेल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण कात्रज परिसरात राहायला आहे. सोमवारी पहाटे तो गावाहून पुणे रेल्वे स्थानक परिसरात आला. तेथून तो पीएमपी बसने कात्रजकडे निघाला होता. तुकाराम शिंदे वाहनतळाजवळ त्याने एकाशी मोबाइलवरुन संपर्क साधला. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक वानखेडे तपास करत आहेत.



















