Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

शहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू

नगर रोडवरील केसनंद रोडवर झाला अपघात

marathinews24.com

पुणे – समोरून आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळी न थांबता तसेच त्याची खबर न देता पसार झाला. हा अपघात गेल्या आठवड्यात नगर रोडवरील केसनंद रोडवर झाला असून, याप्रकरणात आता गुन्हा नोंद केला आहे. विशाल आजिनाथ शेकडे (वय २४, रा. वाघोली) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी महिला पोलिस शिपाई शामबाला पांडव (वय ३०) यांनी तक्रार दिली आहे. त्यानूसार वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.

मोक्काच्या गुन्ह्यात ९ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद – सविस्तर बातमी 

पोलिसांच्या माहितीनुसार, विशाल शेकडे हा त्याच्या दुचाकीवरून (दि. ३ मार्च) रात्री आठच्या सुमारास केसनंद रोडने जात होता. तेव्हा आर्युवेदीक मेडीकल कॉलेजच्या गेटसमोरच भरधाव समोरून आलेल्या वाहनाने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत गंभीर मार लागल्याने विशाल याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, पसार झालेल्या चालकाचा पोलिसांकडून शोध घेत आहेत. अधिक तपास वाघोली पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×