Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

मोक्काच्या गुन्ह्यात ९ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

मोक्काच्या गुन्ह्यात ९ महिन्यांपासून फरार आरोपी जेरबंद

गुन्हे शाखेच्या युनिट चारने केली अटक

marathinews24.com

पुणे – मोक्काच्या गुन्ह्यात फरार असलेला तसेच गेल्या ९ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी रुग्णालयात उपचार घेण्यास आल्यानंतर पोलिसांच्या जाळ्यात सापडला. उपचारानंतर डिस्चार्ज मिळताच त्याला पकडण्यात आले. ही कारवाई चिंचवडमधील मोहननगर भागातील एका रुग्णालयात करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट चारने त्याला जेरबंद केले.

कोंढव्यात रिक्षा चालकावर गोळीबार; चौघे अटकेत – सविस्तर बातमी 

आदीत्य उर्फ सोन्या राजु कांबळे (वय २०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

आदीत्य उर्फ सोन्या कांबळे व त्याच्या साथीदारांनी लक्ष्मीनगर परिसरात गुन्हा केला होता. त्यानंतर तो फरार झाला होता. या गुन्ह्यात त्याच्या साथीदारांना पकडले होते. तेव्हा त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली होती. मात्र, आदीत्य हा पोलिसांना गुंगारा देऊन सातत्याने पळत होता. दरम्यान, तो आजारी असल्याने काही दिवसांपुर्वी चिंचवडमधील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीची खातरजमा करण्यात आली. पोलिसांनी ट्रॅप लावला. आदीत्य दोन दिवसांपुर्वी रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन बाहेर पडणार असल्याचे समजले. त्यानूसार, पथकाने त्याला डिस्चार्ज मिळताच जेरबंद केले. त्याला पुढील कारवाईसाठी येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×