खराडीत वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

धायरी परिसरात मोटारीच्या धडकेत महिला ठार

वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना खराडीतील फाॅरेस्ट पार्क परिसरात घडली. याप्रकरणी पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम सुनील देवनाथ (वय २८, रा. अटलांटिक सोसायटी, केसनंद रस्ता, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत गंगाधर गोविंद शिंदे (वय ३२, रा. शिवरकर वस्ती, वाघोली) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवड्यातील निरीक्षगृहात अल्पवयीनाला मारहाण – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार शुभम हा २८ मार्च रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास खराडीतील फाॅरेस्ट पार्क सोसायटी रस्त्याने निघाला होता. त्या वेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार शुभम याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शुभमला तातडीने खासगी रुग्णलायात दाखल करण्यात आले.

उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. अपघातानंतर पसार झालेल्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी फाॅरेस्ट पार्क सोसायटी रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या वाहन चालकाचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक पोटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×