वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

नगर रस्त्यावरील टाटा गार्ड रुम चौकात घडली घटना

marathinews24.com

पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील टाटा गार्ड रुम चौकात घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाची ओळख पटली नाही.

घरफोडी करुन पसार झालेला चोरटा मुंबईतून अटकेत – सविस्तर बातमी

विमाननगर भागातील टाटा गार्ड रुम चौक गजबजलेला आहे. नगर रस्त्यावरून खराडी, वडगावशेरीकडे जाणाऱ्या वाहनांची वर्दळ या भागात असते. १४ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास दुचाकीस्वार तरुण टाटा गार्ड रुम चौकातून निघाला होता. त्यावेेळी भरधाव वाहनाने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली. अपघातात त्याचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी संदीप ढगे यांनी फिर्याद दिली आहे.

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे वय साधारणपणे ३० ते ३५ वर्षे आहे. त्याची ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक अक्षय सोनवणे तपास करत आहेत. टाटा गार्ड रुम चौकात डंपरच्या चाकाखाली सापडून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×