घरफोडी करुन पसार झालेला चोरटा मुंबईतून अटकेत

डेक्कन नदीपात्रात तरुणाला धमकावून लुटणारे गजाआड

मुंबईतील सांताक्रुज परिसरातून केली अटक

marathinews24.com

पुणे – नामांकित क्वीन्स गार्डन भागात एका सदनिकेचे कुलूप तोडून तीन लाखांची रोकड, तसेच दागिने असा पावणेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरून पसार झालेल्या चोरट्याला मुंबईतील सांताक्रुज परिसरातून अटक करण्यात आली. राजकिरण अनिल जाधव (वय २५, रा. सांतक्रुज, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथील एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्याने पावणेपाच लाख रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना १४ नाेव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली होती. याबाबत एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पेट्रोल पंपावर दहशत माजवणारे गजाआड – सविस्तर बातमी

घरफोडीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट दोनकडून तपास सुरू करण्यात आला. पोलिसांनी क्वीन्स गार्डन, तसेच पुणे स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात संशयित चोरटा दिसून आला होता. चोरटा स्टेशन परिसरातून मोटारीने मुंबईकडे गेल्याची माहिती तपासात मिळाली. तपासात सराइत चोरटा राजकिरण जाधवने घरफोडीचा गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले. पोलिसांच्या पथकाने वाकोला परिसरातून जाधव याला ताब्यात घेतले. जाधव याच्याविरुद्ध राज्याच्या वेगवेगळ्या भागात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने आंध्र प्रदेशातही घऱफोडीचे गुन्हे केले आहेत.

अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बागवे, सहायक निरीक्षक आशिष कवठेकर, अमोल रसाळ, उपनिरीक्षक आदलिंग, कुंभार, चव्हाण, तांबोळी, थोरात, राठोड, शिंदे, लोखंडे, जाधव, मोाकाशी, टकले यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×