सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – दुचाकीस्वार तरूणाचा पाठलाग करीत तिघाजणांनी त्याला अडवून, तु आमच्या अंगावर का थुंकला असे विचारत दमदाटी केली. त्यानंतर त्याच्या गळ्यातील ५० हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली. याप्रकरणी तीन जणांविरोधात सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. शिवम दत्ता आवचर (वय १८, रा. कामठे कॉलनी, नर्हे) याला अटक केली आहे. रोहन संजय रणपिसे (वय २७, रा. धायरी फाटा, सिंहगड रोड) यांनी तक्रार दाखल केली आहे.
चारचाकी वाहनासाठी ‘एमएच ४२ बीएस’ क्रमांकाची नवीन मालिका – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणपिसे हे शनिवारी (दि. ३) रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबई-बंगळुरू हायवेलगत असलेल्या सर्व्हिस रोडवरून घराकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर तिघेजण आले. त्यांनी रोहनला थांबवत तु आमच्या अंगावर का थुंकला असे विचारत दमदाटी केली. त्यावेळी झालेल्या झटापटीत रणपिसे यांच्या गळ्यातील ५० हजार रुपयांची सोन्याची चैन तिघांनी जबरदस्तीने हिसकावून पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी शिवम आवचर याला अटक केली असून, उर्वरीत दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर करत आहेत.