Breking News
केसांचा टोप लाउन घरफोड्या, सराईत टोळीचा पर्दाफाशविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात ९३ टक्के अर्जांचे डिजिटायझेशन पूर्णपोलीस असल्याची बतावणी, जेष्ठेचे २ लाखांचे दागिने चोरलेआंबेडकराईट स्टुडंट असोसिएशनची समाजकल्याण आयुक्तांसोबत चर्चापुण्यात तिरंगा रॅली निमित्त वाहतुकीत बदलतंत्रज्ञानाच्या माध्यमातून २४x७ जनतेशी जोडले जाणे ही काळाची गरज – मुरलीधर मोहोळवकील महिलेची ७० लाखांची फसवणूककंपनीच्या नावे बनावट ‘ग्रुप’ करुन ४० लाखांची फसवणूकहडपसरमध्ये मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठाचा मृत्यूरविवार पेठेत खरेदी करणाऱ्या महिलेचे दागिने चोरीला

रस्त्यावर सिगारेट ओढणाऱ्या तरुणाला हटकले, दुचाकीस्वाराला मारहाण

‘जीममध्ये गाण्यावरुन वादातून मारहाणीची घटना

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – रस्त्यावर सिगारेट ओढणाऱ्या तरुणाला हटकल्याने झालेल्या वादातून तरुणाने एका दुचाकीस्वाराला बेदम मारहाण केल्याची घटना टिळक रस्त्यावर घडली. या प्रकरणी तरुणाला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. विपुल गुल्लापेल्ली (वय १९, रा. मिठ्ठापेल्ली निवास, पालखी विठोबा चौक, नाना पेठ ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत सौरभ विनायक मेथे (वय ३२, रा. प्रभु श्रीराम अपार्टमेंट, रेणुका स्वरुप शाळेजवळील गल्ली, सदाशिव पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कारवाईची भिती दाखवून ज्येष्ठांची १ कोटी ३० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार सौरभ हे २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास टिळक रस्त्यावरुन निघाले होते. त्या वेळी सदाशिव पेठेतील टपाल कार्यालयासमोर गुल्लापेली हा सिगोरट ओढत थांबला होता. रस्त्यात सिगारेट ओढणाऱ्या गुल्लापेल्लीला सौरभ यांनी बाजूला होण्यास सांगितले. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी ‘तू समाजसेवा करु नको’, असे गुल्लापेल्लीने त्यांना म्हणाला. या कारणावरुन त्यांच्यात वादावादी झाली. गुल्लापेल्लीने सौरभ यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड घालून तो पसार झाला. पसार झालेल्या गुल्लापेल्ली याला अटक करण्यात आली असून, पोलीस हवालदार भुजबळ तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×