कारवाईची भिती दाखवून ज्येष्ठांची १ कोटी ३० लाखांची फसवणूक

एमएनजीएल मीटर अपडेटच्या बहाण्याने जेष्ठाची साडेतीन लाखांची फसवणूक

सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – कारवाईची भीती दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. सायबर चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या घटनेत कर्वेनगर भागातील एका ज्येष्ठ महिलेसह दोघांची १ कोटी ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ६७ वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने २२ लाखांची फसणूक – सविस्तर बातमी

तक्रारदार कर्वेनगर भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर जुलै महिन्यात संपर्क साधला होता. ‘तुमच्या बँक खात्यातून काळ्या पैशांचा व्यवहार करण्यात आला आहे. या प्रकरणी मुंबईतील गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणात अटक टाळायची असेल, तर तातीडने पैसे जमा करावे लागतील’, अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली. चोरट्यांनी भीती दाखविल्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी ऑनलाइन पद्धतीने ९७ लाख ५० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस निरीक्षक संगीता देवकाते तपास करत आहेत.

अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी सारसबाग परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. तक्रारदार ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिक नेहरु स्टेडीयम परिसरातील एका सोसायटीत राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी कारवाईची भीती दाखवून त्यांची फसवणूक केल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ईडी, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, सीबीआय अशा केंद्रीय तपास यंत्रणेतील अधिकारी असल्याची बतावणी, तसेच कारवाईची भीती दाखवून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top
×